बुलडाणा– विदेशात पतसंस्थेचे कडक कायदे आहेत. त्यात ग्राहक, खातेदार, ठेविदार यांना तीन दिवसाचे प्रशिक्षण दिल्या जाते, व अशांनाच पतसंस्थेचा लाभ मिळतो, अशा प्रकारची शिस्त असल्यामुळे वसूली व थकबाकीचा प्रश्न विदेशात निर्माण होत नाही. तेथील पतसंस्थाचा प्रमाणिकपणा लक्षणिय आहे. तेथील कायदे अतिशय कठोर व चांगली आहेत. असे कायदे भारतात निर्माण करण्यात यावे अशी मागणी केद्रींय मंत्री अमीत शहा यांच्याकडे लवकरच करणार आहोत, असे प्रतिपादन सत्कारास उत्तर देतांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, जागतिकस्तरावरील सहकार परिषदचे आयोजन करण्याची संधी भारताला मिळावी, एवढेच नव्हे तर ही परिषद बुलडाण्यात व्हावी अशी माझा तीव्र ईच्छा आहे, ज्या दिवशी हे नियोजन पुर्ण होईल त्या दिवशी पतसंस्था चळवळीच्या इतिहासात बुलडाण्याचे नाव सुवर्ण अक्षरात नोंदविले जाईल असे त्यांनी बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर सहकार रंगमंच सांस्कृतिक भवन येथे आयोजित सत्कार समारोहात सांगितले. हा समारोह 14 सटेबर 2022 रोजी सायंकाळी पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन बुलडाणा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाला बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलडाणा अर्बनचे चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर, राज्य फेडरेशनचे महासचिव डॉ.शांतीलाल सिंगी, फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, खजिनदार दादाराव तुपकर, नागपूर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र अर्बन बँक असोसिएशनचे संचालक तथा माजी अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, आ. श्वेता महाले, सुरेंद्र प्रसाद पांडे, डॉ. स्वाती वाकेकर, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई चे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांची असोसिएशन ऑफ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट युनियन या आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था फेडरेशनच्या निवडणुकीमध्ये 32 देशाची शिखर संघटना एशियन क्रेडिट युनियनच्या खजिनदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार बुलढाणा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष राधेश्याम चांडक, व सर्व संचालकांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देवून केला. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत आयोजकांच्यावतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राजुदास जाधव यांनी केले. यावेळी बुलढाणा अर्बनचे चिफ मैनेजिंग डायरेक्टर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना माहिती दिली की, काका साहेबांचे काम हे इंटिग्रेशन आहे. आशिया खंडातील सर्व पतसंस्था या विभाजित आहेत याची विविध कारणे आहेत हे जोडण्याचे काम आता फेडरेशनला करायचे आहे. काका साहेबांनी अनेक ठिकाणी विविध देशात कॉन्फरन्स केल्या या कॉन्फरन्समध्ये त्यावेळी आमच्या सातत्याने लक्षात आले की, या कॉन्फरन्ससाठी नेपाळ भूतान आदी देशांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळायची मात्र भारताला मिळायची नाही, आम्ही प्रयत्न केलेे. काकासाहेब तीन-चार वेळेस उभे राहिले 2016 मध्ये या विषयावर आमचा आंतरराष्ट्रीय सहकार परिषदशी वाद झाला. त्यांचे म्हणणे होते आपल्या देशात सिस्टम आमच्या देशातील मॅच होत नाही त्यामुळे आम्हाला संधी मिळात नव्हती. आता काका साहेबांना संधी मिळाली आहे. त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो असे ते म्हणाले. त्यानंतर श्याम उमाळकर, आ. श्वेता महाले,
प्रा. संजय भेंडे यांनी ही विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन धांडे यांनी केले तर आभार श्री सुरेद्रंप्रसाद पांडे यांनी मानले.