प्रतीनिधी रवि मगर- चिखली:- लोककथीत रमेश नामदेव अवचार , (निवृत्त S T ड्राइव्हवर) यांचं वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी निधन झालं. रितीरिवाजानुसार तिसऱ्या दिवशी 15 सप्टेंबर 2022 रोजी त्यांचा जलदान विधीचा कार्यक्रम होता. तेव्हा अवचार परिवाराकडून त्यांचे सर्व कुटुंबीय, जावई – नंदकिशोर भटकर, चंद्रशेखर भटकर, वानखेडे सर व प्रा. विजय वाकोडे यांनी उत्सव समितीने मांडलेल्या संकल्पनेचा विचार करून जलदान विधी साठी भोजनावर होणारा खर्च न करता चिखली येथील नागसेन बुद्ध विहार या ठिकाणी सुरू असलेले भव्य ग्रंथालय ज्यात अनेक विद्यार्थी एमपीएससी यूपीएससी चा रात्रंदिवस अभ्यास करतात, त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मदत व्हावी यासाठी अर्पण करण्यात आला. हा निधी नागसेन बुद्ध विहाराचे उपाध्यक्ष आयु.बी.बी. साळवे,आयु. आर.एस.जाधव,आयु.विणकर सर व प्रा. डॉ.सुभाष राऊत यांनी स्वीकारला. उत्सव समितीच्या वतीने पत्रक काढून सामाजिक दृष्ट्या काही कालबाह्य झालेल्या बाबींना फाटा देऊन आदर्श समाज घडावण्यासाठी आवश्यक बाबींचा समावेश करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतीसाद म्हणून आनेक ठिकाणी या संकल्पनेचा अंगीकार करण्यात येत आहे. अवचार परिवाराकडून मोजकेच नातेवाईक जाऊन स्मशान भूमीतून रक्षा जमा करून आणली व त्यांच्या राहत्या घरी आदरांजली कार्यक्रम पार पडला. त्यातही मोजक्या आणि जवळचा संबंध असणाऱ्या केवळ दोनच नातेवाईकांनी कालकथित रमेश अवचार यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. आणि त्यांची रक्षा ही विहीर किंवा नदीत विसर्जित न करता शेतात पुरून त्यावर पवित्र वृक्षाची लागवड करणार आहेत. हा आदर्श सर्व समाजबांधवांनी घ्यावा असे समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ.सुभाष राऊत यांनी आवाहन केले. तसेच यावेळी प्रा.डाॅ. राजु गवई, संम्बोधी संस्थेचे एस एस गवई, विनकर सर, विलास वानखडे हे उपस्थित होते.