आजच जग खुपच धावपळीच आहे. जगाने चांगली प्रगती केली त्यात खुप देश प्रगतशील आहेत, देशातील प्रत्येक माणुस हा आपापल्या परीने जमेल त्या दिशेने मार्गाने आपली, आपल्या कुटुंबाची, समाजाची आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत आहे. सामान्य माणसाच्या बाजुने विचार केला तर नेमकी प्रगती म्हणजे काय ? तर प्रगती म्हणजे आपण ज्या परिस्थिती मध्ये राहायचो, त्यापेक्षाही चांगली परिस्थिती येणे. तसं पाहिलं तर सामान्य माणुसच नाही तर सर्व जगाच्या बाबतीत देखील प्रगती ही अशीच असते. प्रत्येक माणसाला काम मिळणं हा आर्थिक प्रगतीमधील मुळ गाभा आहे. काम मिळालं की हातामधे पैसा येतो, त्या पैशातून आपण काय काय करू शकतो स्वतः साठी कुटूंबासाठी समाजासाठी याच गणित प्रत्येक माणुस घालत असतो. घरामध्ये लागणारा खर्च म्हणजेच कमीत-कमी दोन वेळेचे जेवन, घरांमध्ये सर्वांना लागणारी कापडं, मुलांच शिक्षण, तसेच चांगल पक्क घर जे की त्या घरामध्ये सर्व कुटुंब सुरक्षित राहु शकेल आणि घरांमधे कोणी सदस्य आजारी पडला, तर त्यासाठी होणारा दवाखाण्याचा खर्च या सर्व खर्चाचं विवरण कामातून मिळणाऱ्या पैशातून होतं.
हे सर्व खर्चाच योग्य विवरण केंव्हा होईल, जेव्हा चांगला रोजगार मिळेल, आणि रोजगार मिळण्यासाठी देशामध्ये खुप प्रमाणात रोजगार निर्माण होणं गरजेचं आहे, माणसाच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्या मिळालेल्या कामाची सध्याच्या काळानुसार, महागाईनुसार योग्य ती किंमत असली पाहिजे, म्हणजेच माणसाला कामातून मिळणारा पैसा, पगार कमी नसून योग्य असला पाहिजे. तरच माणसाची आर्थिक प्रगती होईल.
तसे पाहिले तर प्रगतीचे अन्य कारणंही आहेत, पण प्रत्येक माणसाला मिळणारा रोजगार हा आर्थिक प्रगतीचा गाभा आहे.
प्रगती ही मनाची देखील असते म्हणजेच आपल्या बुद्धीची, विचारांची, स्वभावाची, आपल्या प्रत्येकाच्या बोलण्याची, प्रत्येक माणुस कोणतेही चांगले काम करण्यासाठी सर्वप्रथम विचार करतो आणि पक्क मन ठामपणे ठेऊन पुढील कार्य करतो, म्हणजेच पुढे आर्थिक प्रगतीला सुरवात करू शकतो त्याचबरोबर आपल्या मनाची शांती, संयम, सुख या गोष्टी आपल्या स्वतः च्या विचाराने, मनाने चांगल्या प्रकारे प्राप्त करू शकतो, म्हणजेच माणुस आपल्या बुद्धीची, विचाराची, मनाची चांगली प्रगती करतो आणि हीच प्रगती जगामधे होणाऱ्या सर्व प्रगतीचे मुळ आहे, थोडक्यात प्रत्येक प्रगतीचा गाभाच आहे..!!
तु ठरव शांतीनं तुझ्या मनात
घाल गवसणी तुझ्या विचाराची….
बदल घडुदे तुझ्या संयमी मनात
होईल प्रगती पुढे तुझ्या जीवनाची !!
- लेखक/ कवि:- विजयपाल रावसाहेब शृंगारे, बोटकुळ, निलंगा, लातुर