( बुलडाणा ) आज दिनांक 12/09/22 रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ द्वारा संचलित मॉडेल डिग्री कॉलेज बुलढाणा येथे, स्वामी विवेकानंद यांचे 1893 मध्ये 11 सप्टेंबर रोजी शिकागो येथील विश्व धर्म परिषदेमधील , विश्व प्रसिद्ध व्याख्यान दिवस आपण दिग्विजय दिवस म्हणून साजरा करतो.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ.केदार ठोसर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. रघुनंदन देशमुख हे होते .प्रा.रघुनाथ देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शक भाषणामध्ये स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर प्रकाश टाकला व त्यांच्या विचाराचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गुलाबराव सोनोने यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मुकुंद देशपांडे तर आभार प्रदर्शन प्रा.निकेत चंदिलवाले यांनी केले .तसेच कार्यक्रमासाठी प्राध्यापक वर्ग , विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.