सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव 15 ऑगस्ट 1947 रोजी पूर्ण देश झाला असला तरी हैद्राबाद प्रांत , जम्मु-काश्मीर आणी जुनागड पारतंत्र्यात होत. हैद्राबाद प्रांतात मराठवाडा, तेलंगणा, आंद्रप्रदेश आणी कर्नाटकातील काही भाग शामिल होता. निजामाला हैद्राबाद हे स्वातंत्र देश म्हणून घोषित करायचे होते किंवा हैद्राबाद संस्थान ला पाकिस्तान मध्ये विलीन करायचे होते. जैसे थे करारानंतर दडपशाही सुरु झाली. हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विलीन व्हावा यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम सुरु झाला. यात गोविंदभाई श्राफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे आणी सीमेवर असणाऱ्या तांडा वस्तीवरील गोर गरिबांचा मोलाचा वाटा होता. जैसे थे करार भंग होऊ लागल्यानंतर 13 सप्टेंबर 1948 रोजी तत्कालील गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन पोलो मध्ये भारतीय फौजा निजामाच्या राज्यात गुसवल्या. आज औरंगाबाद जिल्यातील सोयगाव तालुक्यातील नांदातांडा – घाणेगावतांडा हे त्यावेळी भारत – हैद्राबाद संस्थानाची सिमा होती. मी ही त्याच तांड्यावर राहतो. आमच्या तांड्यातील-तांड्यातील, घरा-घरातील अनेक स्वातंत्रसेनानींनी त्यावेळी कमर कसली होती. नांदातांडा – घाणेगावतांडा येथे भारतीय फौजेची छावणी तयार करण्यात आली होती. नांदातांडा – घाणेगावतांडा मधील गोर-गरीब नागरिकांनी हैद्राबाद प्रांतात असून सुद्धा भारतीय फौजाना फुल ना फुलाची पाखळी सारखी जमेल तशी मदत केली. आणी अशा नांदातांडा – घाणेगावतांडा पासून तर आजच्या विशाखापटणम पर्यंत भारतीय फौजेने तगडा नियोजन केल होत. घाबरलेला निजाम शेवटी 17 सप्टेंबर 1948 रोजी संध्याकाळी 5 वाजता भारतीय सैन्याला शरण आला. अन मराठवाडा सह पूर्ण हैद्राबाद संस्थान भारतात शामिल होऊन स्वातंत्र झाल. म्हणून आपण दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो.