प्रतिनिधी,प्रविण चव्हाण; नंदुरबार -: शहरातील बालवीर चौक परिसरातील शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे शहीद दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एक शाम शहीदो के नाम कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यंदा 9 सप्टेंबर रोजी शहिंदांच्या बलिदानाला 80 वर्ष पूर्ण झाली.
हे औचित्य साधून शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे एक शाम शहीदो के नाम या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या हस्ते भारत माता आणि हुतात्मा शिरीषकुमार प्रतिमा पूजनाने करण्यात आला.
यावेळी शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आर. एस. प्रजापत, कल्पना प्रजापत, ज्ञानपीठ प्रतिष्ठानचे चेअरमन योगेश्वर जळगावकर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ.निर्मल गुजराती, डॉ. काणे प्राथमिक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुलभा महिरे उपस्थित होत्या. प्रारंभी श्री गणरायाच्या आरती नंतर देशभक्तीपर गाणे सादर करण्यात आले.ए मेरे वतन के लोगो जरा…आँख में भर लो पानी जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी या गीतावर उपस्थित रसिकांनी भारत माता की जय..
वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूरचैतन्य आर्केस्ट्रा ग्रुपतर्फे एसटी महामंडळातील गायक कलावंत संजय मोरे, एम.एम.सय्यद, मनोज बाविस्कर, मनोज खैरनार, तसेच राजेश मछले आणि वंदना चित्ते यांनी विविध देशभक्तीपर गीते सादर केली.
या प्रसंगी रसिकांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महादू हिरणवाळे, अशोक यादबोले, डॉ.गणेश ढोले, संभाजी हिरणवाळे, गोपाल हिरणवाळे, सुदाम हिरणवाळे, विशाल गवळी, धीरेन गवळी , सिद्धू नागापुरे आदींनी संयोजन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लीना हिरणवाळे तर आभार भाग्यश्री यादबोले या विद्यार्थिनींने केले.