सोयगाव महाराष्ट्रात जळगाव, पुणे,बुलढाणा व औरंगाबाद, या जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरात सध्या पाळीव पशुंमध्ये लंपी स्किन या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे.जनावरे दगावत आहेत. केंद्र शासनाने प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ नुसार अधिसूचित केलेल्या रोगांमध्ये ‘लंपी स्किन’ या रोगाचा ‘अनुसूचित रोग’ म्हणून समावेश केलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन तहसीलदार रमेश जसवंत यांनी केले आहे. ‘लंपी स्किन रोग नियंत्रण समिती’चे अध्यक्ष तथा तहसीलदार रमेश जसवंत यांनी तसेच ग्रामसेवक, पो.पाटील,कोतवाल, कृषी सहाय्यक, सरपंच,तलाठी,शेतकरी व पशुधन अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांची बैठक घेऊन आजाराविषयी सविस्तर चर्चा करून तहसीलदार रमेश जसवंत यांनी मार्गदर्शन केले.
याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यामध्ये ७१,५०० गाय व म्हैस वर्गीय जनावरे आहेत. लंपी हा विषाणूजन्य रोग गायी व म्हशींमध्ये आढळतो. या रोगात पशुंना ताप येणे, पूर्ण शरीरावर 10 ते 15 मि.मी. व्यासाच्या कडक गाठी येतात व तोंडात, नाकात व डोळ्यांत व्रण येतात. सदरचा विषाणूजन्य रोग प्रादुर्भाव विविध प्रकारचे कीटक गोचिड, गोमाश्या इत्यादीं मार्फत जलद प्रसार होतो. तालुक्याच्या सीमेवरील औरंगाबाद व पुणे जिल्ह्यात या रोगाची साथ वाढत असल्याने करमाळा पशुसंवर्धन विभागातील अधिकारी / कर्मचारी यांना सदर रोगाच्या अनुषंगाने सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या रोगाला घाबरून न जाता पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेत कळवावे.सध्या सोयगाव पूर्ण तालुक्यात मोफत लम्पी स्क्रीन लसीकरण मोहीम मोफत चालू आहे. शेतकऱ्यांनी जनावरांना लसीकरण करून घ्यावे.बाधित जनावरे वेगळी बांधावीत. त्यांचे चारा / पाणी व इतर अनुषंगिक साहित्य सुद्धा वेगळे ठेवावे. प्रथम निरोगी जनावरे यांना चारा-पाणी करावे व नंतर बाधित जनावरे यांच्याकडे जावे आणि त्यांचा चारापाणी करून घ्यावे. बाधित जनावरे यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या सल्ल्यानुसार त्वरित औषधोपचार सुरू करावेत. गोठा व लगतच्या परिसरात डास, माशा, कीटक व गोचिड यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी डेल्टामेथ्रिन, सायपरमेथ्रिन सारखी औषधे पशुवैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांचे मार्गदर्शनानुसार वापरावीत. सदर रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुपालकांनी घाबरून न जाता जागरूक होण्याचे व नमूद प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांनी केले आहे.
याप्रसंगी सोयगाव तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी विनोद चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी,ग्रामसेवक, सरपंच, पो.पाटील, तलाठी, कृषी सहाय्यक, कोतवाल,कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.