नुकसान भरपाई द्या प्रहार जनशक्ती पक्षाची व शेतकऱ्यांची मागणी

Khozmaster
2 Min Read

अहमदपूर तालुक्यातील किनगाव मंडळातील 28 जुलै ते 2 सप्टेंबर पर्यंतचा कोरडा काळ त्यानंतर संततधार पावसामुळे नुकसान, त्यानंतर गोगलगाय मुळे नुकसान झाले, नुकसानची भरपाई द्या प्रहार जनशक्ती पक्षाची व शेतकऱ्यांची मागणी*

तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले . अहमदपूर तालुक्यातील किनगाव मंडळातील 28 जुलै ते 2 सप्टेंबर पर्यंतचा कोरडा काळ त्यानंतर संततधार, गोगलगायमुळे झालेले नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.आता सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक रोग पडला आहे, सोयाबीन मध्ये दाणे भरत नाहीत यारोगामुळे शेंगा चपट्या दिसत आहेत ,शेंगा मध्ये वाढ होत नाही चारही बाजूंनी किनगाव परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यातच अहमदपूर तालुका अनुदानातुन वगळण्यात आला आहे कोणताही नेता, मंत्री, अहमदपूर तालुक्यातील झालेले नुकसान बघायलाच तयार नाही किनगाव हे मोठे मंडळ आहे किनगाव परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे, प्रशासनाने किनगाव हे कोणत्या निकषावर वगळयात आले आहे,सदरिल गोष्टींचा छडा लावण्यात यावा, शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत विचार करून प्रशासन व विमा कंपनीने योग्य ती कार्यवाही करावी शेतकऱ्यांना अनुदान व पिक विमा मंजुर करण्यात यावा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांना निवेदन तहसिलदार मार्फत देण्यात आले,प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले, शाखाअध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष शेख मोहसीन, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, सचिव दशरथ हैगले,सहसचिव महेश चाकाटे, युवा अध्यक्ष गोविंद आंधळे, सहसंघटक वैजनाथ सुनेवाड, संघटक श्रीराम दहिफळे ,तालुका पदाधिकारी म्हणुन तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड , उपाध्यक्ष सतिश पुरी,सचिव नवनाथ तरोडे, इम्रान पठाण,सखाराम कुलकर्णी, प्रमोद स्वामी, अदिजण प्रहार पदाधिकारी प्रहार सेवक उपस्थित निवेदन देण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *