बी एस गुरव जामनेर तालुका प्रतिनिधी 🙏 देऊळगाव ला ही कुणी सत्काराच्या काबिल भाऊचा लाल मिळेल का🙏 जामनेर तालुका प्रतिनिधी बीएम गुरव देऊळगावकर देऊळगाव गुजरी हे गाव जळगाव जिल्ह्याचे व जामनेर तालुक्यावरचे शेवटचे गाव असून या साईटला मराठवाड्याचा विभाग त्या साईटला विदर्भाचा विभाग असा हा परिसर असून पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सोयगाव तालुक्यातील सावळद बारा या गावाला पंचवीस किलोमीटर अंतरावरील फत्तेपुर या सब स्टेशन वरून लाईनचा सप्लाय व्हायचा त्या अगोदर सावळत बारा येथे सप्लाय जाळीचादेव येथून होता पण त्या परिसरातील जबरदस्त राजकीय पुढारी यांच्या कर्तुत्वाने सावळत बारा करांना दोन दोन दिवस तीन-तीन दिवस लाईन मिळायची नाही ते बेजार व्हायचे पण त्या परिसरातील जनतेने त्यांच्या आमदारा खासदारांना सांगून आमच्या परिसरात काही नाही झाली तरी चालेल पण आम्हाला सावळतबारा येथे सबस्टेशन द्या हीच मागणी लावून धरली रेटून धरली व त्यांचे फलित गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री असताना सावळद बारा सर्कलमध्ये 33 केवीचे सब स्टेशन सुरू झाले व लाईनच्या संतापातून रोगातून सावळदबारीकरांची मुक्तता झाली ते इतर बाबतीत नसतील पण लाईनच्या बाबतीत आनंदी आनंद जीवन जगत आहेत आता आमचे इतके हाल होत आहेत की शनिवारी चार वाजता दुपारी गेलेली लाईन रविवारी दुपारी एक वाजता येते बुधवारी रात्री बारा वाजता गेलेली लाईन गुरुवारी रात्री आठ वाजता येते पाणी पावसाळ्याचे दिवस असून देऊळगावकर लाईनच्या बारात तर झाले की आमचे पै पाहुणे नातेवाईक सुद्धा आम्हाला म्हणतात की नाही रे बाबा तुमच्या गावात लाईन नाही आम्ही पुढच्या हप्त्यात तुमच्या गावाला येऊ पाणी पाऊस नसला तर असेही ते आम्हाला नात्यागोत्याने गमतीने हिणवतात काही काही मोबाईल धारकांनी तर या लाईन बद्दल मोबाईल वर कमेंट करणे टोमणे मारणे असे बरेचसे उद्योग दिवसभरात चालतात कोणी म्हणत पुरागाव अंधेरे मे कोई कुछ बोलताच नही ये क्या बात है औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील आमदाराने विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला की शिक्षक लोक मुख्यालय का थांबत नाही तो मुद्दा अनेक शिक्षकांना खटकला चला ते ठीक आहे गावात शिक्षक नाही राहिले तरी काही हरकत नाही कारण शिक्षकाचे काम सकाळी सात ते दोन किंवा सकाळी 11 ते संध्याकाळचे पाच पर्यंत शाळा असते शिक्षक कुठेही थांबला त्याची काही अडचण नाही पण ज्याच्यावर गावाच्या विकासाची आरोग्याची दळणवळणाची पाण्याची लाईनची अशी गाव खेड्याची मोठी जबाबदारी असते असे ते दोन घटक म्हणजे ग्रामसेवक व स्थानिक वायरमन हे दोघे गावात राहणे फार फार जरुरी आहे पण हे दोन लोक दोन चार पाच पुढाऱ्यांना हाताशी धरून या पक्षाचाही त्यांचा त्या पक्षाचाही त्यांचा अंगावर करून घेतात व मुख्यालय राहतच नाही आता आमचे फत्तेपुर सब स्टेशन आमच्या इथून 12 किलोमीटर अंतरावर आहे त्या सबस्टेशनचे मुख्य अभियंता हे महाशय जामनेर वरून अपडाऊन करतात कधी येतात कधी येत नाहीत सर्व कारभार यांचे दोन-तीन जुने असलेले मुरलेले वायरमनच बघून घेतात व यांची कुठेच तक्रार वाचता होत नाही त्यामुळे कसं सगळं अलबेला आहे आता दोन दिवसांपूर्वी फत्तेपुर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पिंपळगाव सो खांबे या जंगलातील असलेल्या गावात ही लाईन राहत नव्हती असे तेथील नवनियुक्त सरपंच आत्माराम गावंडे व गावकरी म्हणायचे परेशान व्हायचे बेजार व्हायचे पण अचानक पणे काय जादूची काळी फिरली रामजाने दोन-तीन दिवसांपूर्वीच आत्माराम गावंडे यांची फत्तेपूर ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी नियुक्ती झाली व त्यांनी नियुक्ती होताच पहिले कोणते काम केले असेल तर फत्तेपुर 33 केव्ही उपकेंद्राचे सब स्टेशनचे ऑपरेटर आकाश सोनवणे यांचा त्यांनी हुसेन भाई तडवी मोती नाईक ग्रामपंचायत सदस्य फिरोज तडवी विश्वनाथ विचवे व करतार नाईक असे गावकरी सब स्टेशनला जाऊन हार तुर्याने आकाश सोनवणे या अप्रेडचा सत्कार केला उपसरपंच आत्माराम गावंडे म्हणाले की या सब स्टेशन वरून 22 गावांना विजेचा पुरवठा केला जातो गावठाण शेती फिट कसे हाताळायचे
हे आपरेटर आकाश सोनवणे जाणतो एका गाव फिटरवर अनेक गावे असतात या अगोदर पिंपळगाव मध्ये नेहमीच रात्रीच्या वेळेस गाव अंधारात असायचे वीज पुरवठा मिळावा म्हणून तेथील गावकऱ्यांनी फत्तेपूर वीज उपकेंद्रावर मोर्चे आणले आंदोलने केलीत वीज उपकेंद्राला कुलूप सुद्धा ठोकले पण देऊळगाव गुजरी करांना तेही करता येत नाहीत कारण यांनी आंदोलने मोर्चा कधी काढलाच नाही व तशी सवय त्यांना 25 वर्षांमध्ये कधी पडली ही नाही कारण अशा फालतू झंझोटीमध्ये येथील जनता पळतच नाही असे हे शांत शितल जनता आहे आणि त्यात आमचा लाईन चा सप्लाय म्हणजे मराठवाड्यातील सावळत बारा सब स्टेशन वरून होतो लाईन गेली त्यांना फोन केला तेथील ऑपरेटर फोन उचलत नाही जास्त बोलायला गेले ते अरे चोरीच्या भाषेमध्ये सांगतात तुमची लाईन तिकडून जोडून घ्या इकडे तुमचा काही संबंध नाही असे अज्ञानी व अनिल तट्टू वृत्तीचे आपरेटर येथे आहे त्यामुळे देऊळगाव चे जनता साधा फोनही तेथे लावत नाही तरी आम्हा देऊळगावकरांना सुद्धा आकाश सोनवणे सारखा ऑपरेटर माईचा लाल नाही भाऊचा लाल सारखा ऑपरेटर मिळेल का व आम्हालाही आकाश सोनवणे सारखे सब स्टेशनला जाऊन त्याचा सत्कार हार तुरे देऊन करता येईल का अशीही आजची दैनिक देशदूतला आलेली बातमी पाहून बरेचसे सुज्ञ जाणकार लाईन पायरो बेजार झालेले देऊळगाव वासीय दिवसभर कुजबूज करीत असल्याचे दिसले असा हा बातमीचा घेतलेला मा गोवा पाहूया आम्हालाही कोण्या वायरमन चे उप अभियंता या ऑपरेटरचे हार तुरे देऊन सत्कार करण्याचे सौभाग्य प्राप्त होते का व आम्ही या लाईनच्या जंजाळातून मुक्त होतो का
Users Today : 39