दि.16-09-2022 रोजी मौजे – पळाशी येथे कृषि विभाग, आत्मा, अंगणवाडी व पशुसंवर्धन विभाग यांचे मार्फत शेतकरी वर्गास विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले
यात प्रामुख्याने एस.जी.वाघ तालुका कृषि अधिकारी सोयगाव यांनी कापूस पिकावर मार्गदर्शन केले, एच.बी.देशमुख कृषि पर्यवेक्षक यांनी पी.एम.किसान ई पिक पाहणी व पिक विमा या विषयी माहिती दिली, पी.आर.वाघ कृषि सहाय्यक यांनी बोंड अळी व लष्करी अळी याविषयी मार्गदर्शन केले, एस.जी.बोरसे कृषि सहाय्यक यांनी कापूस मर रोगावर मार्गदर्शन केले, आर.एन.साळुंखे यांनी महाडीबीटी योजनेची माहिती दिली, ए.एस.महाजन यांनी मका पिक शेतीशाळा व पी.एम.एफ.एम.ई योजनेची माहिती दिली, एस.के.ठाकरे अंगणवाडी पर्यवेक्षक यांनी पोषण आहार याविषयी माहिती दिली, एस.के.काळे पशुधन पर्यवेक्षक यांनी जनावरातील लंपी आजारावरील उपाय योजना व लसीकरणाविषयी मार्गदर्शन केले.