मोताळा : एसटी बसच्या गिअर बॉक्सच्या झाकन आलेल्या पत्र्याने रस्त्यावरून चालणाऱ्या 55 वर्षीय शेतकऱ्याचा हात दंडापासून तर मॉर्निग वॉक करणाऱ्या एका युवकाचा याच पत्र्यामुळे आपला हात गमावल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मलकापूर ते पिंपळगाव देवी दरम्यान ग्राम आव्हा व उऱ्हा येथे घडली. याबाबत धामणगाव बडे पोलीस ठाण्यात आरोपी बस चालकां विरुद्ध विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज सकाळी 6 वाजे दरम्यान मलकापूर डेपोच्या बस क्रमांक एमएच 40 एन 9121 च्या गिअर बॉक्स वरील झाकणाच्या वरील पत्र्याने आपल्या शेतात जात असलेल्या ग्राम आव्हा येथील 55 वर्षीय परमेश्वर सुरडकर यांचा हात कटला तर याचं रस्त्यावरील ग्राम उऱ्हा येथे पोलीस भरतीसाठी सराव करणाऱ्या दोन युवकांना जखमी केले. त्यापैकी 22 वर्षीय विकास गजानन पांडे युवकांचा हात कटून वेगळा झाला आहे. तर काही तरुण किरकोळ जखमी झाले आहे. जखमी झालेल्याना तात्काळ उपचारासाठी मलकापूर येथे हलविण्यात आले होते. दरम्यान 55 वर्षीय परमेश्वर सुरळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव खान्देश येथे पाठविण्यात आले आहे. तर विकास गजानन पांडे या युवकावर मलकापूर येथील डॉक्टर चोपडे यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान अपघातानंतर संतप्त जमावाने मलकापूर डेपोत तोडफोड केेली. दरम्यान भगवान सुरडकर वय 73 वर्ष राहणार आव्हा तालुका मोताळा यांच्या यांच्या फिर्यादीवरून धामणगाव बडे पोलिसांनी आरोपी बस चालक देवराव सूर्यवंशी यांच्याविरुद्ध अप. क्रमांक 247/22 च्या कलम 279, 337, 338, भांदवी तथा मोटार वाहन कायद्याच्या कलम 314/187, 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पो.हे.कॉ प्रशांत पाटील करीत आहे.