पातुर तालुक्यातील मौजे गोंधळवाडी येथे गट क्रमांक 30/2 नामे संजय केशरिमल बाहेती ह्यांचं असून त्यांच्या शेताच्या पश्चिमेकडून राष्ट्रीय महामार्ग 161 जातो.नव्याने ह्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणच काम जोमात झाले त्यासाठी सदर गटातील 25 गुंठे क्षेत्र राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण साठी संरक्षित केले.आणि सदर जमिनीचा मोबदला पण शेतकर्यांला मिळाला व त्यातून रस्ता निर्माण झाला व उर्वरित 56 गुंठे शेतातील क्षेत्रावर सदर शेतकर्यांने सोयाबीन व तूर पिकाची पेरणी केली.सदर पीक परिपक्व अवस्थेत असताना राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण विभागाने त्यातून शेतकऱ्याला कोणतीही पुर्व सूचना न देता नालि केली ह्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन व तुर पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आधीच ओल्या दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्याला आता रस्ता बनवणाऱ्या कंपन्यामुळे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.आणि कोणती पूर्व सूचना न देता उभ्या काढनिस आलेल्या पिकात ज्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यानी आणि रोड बनवणाऱ्या कंपनीच्या कर्मचारी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे