सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त प्रथम राष्टपिता महात्मा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या केंद्र प्रमुख एम.डी.सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रीपळ फोडून ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला. जि.प.उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आली.यावेळी शिक्षक भागवत गायकवाड यांनी थोडक्यात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कुसुमाग्रजांच्या कवितेतील “एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार” ही ओळ उद्घृत करुन गायकवाड म्हणाले, अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी अशा ध्येयधुंद भावनांनी हैद्राबाद मुक्ती लढ्यासाठी जीवाची बाजी लावुन तुरुंगवास भोगला, हौतात्म्यही पत्करले अशा सर्व ज्ञात- अज्ञात स्वातंत्र्य सेनानी आणि वीरांगणांना आदरांजली अर्पण करतो. मराठवाडा मुक्तिसंग्राम हे आपल्या इतिहासातील देदीप्यमान पर्व होते. आजच्या पिढीला या इतिहासाची माहिती देणे काळाची गरज आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांचा मिळून हैद्राबाद मुक्तिसंग्राम कार्यक्रम असणार आहे. हैद्राबाद संस्थानवर निजाम मीर उस्मान अली यांचे राज्य होते. त्यांच्या राजवटीतून मुक्त होवून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरु झाला. या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ, दिगंबरराव बिंदु, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटेश्वर गावच्या दगडाबाई शेळके यांच्यासारख्या अनेक महिलांच्या योगदानाची आज आठवण होते. या लढयातील सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे मोल करणे शक्य नाही असेही भागवत गायकवाड म्हणाले. यावेळी जि.प.शाळेचे केंद्रप्रमुख एम.डी.सोनवणे, भागवत गायकवाड, सतीश ढोणे, निता हिरास मँडम, गवयीसर,शाळेय व्यास्थापन अध्यक्ष सुपडा तडवी, शिक्षकवृंद,विद्यार्थी,अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.