बुलडाणा प्रतिनिधी: जिल्ह्याचे वैभव असलेल्या बोथा फॉरेस्टचा प्रसार आणि प्रचार होण्या बरोबरच पर्यटनाला चालना मिळावी व आरोग्याच्या संदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी बुलडाणा अर्बनच्या वतीने बुलडाणा अर्बन फॉरेस्ट मान्सुन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी बुलडाणा अर्बन ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर गृप आणि बुलडाणा सायकलींग गृपच्या संयुक्त विद्यमाने येत्या 9 ऑक्टोबर रोजी या मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यास्पर्धेत 1000 ते 1500 स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे अशी माहीती बुलडाणा अर्बनचे मॅनेजींग डायरेक्टर डॉ. सुकेश झंवर यांनी आज 18 सप्टेंबर 2022 रोजी येथे पत्रकार परिषदेत दिली. येथील बुलडाणा अर्बन रेसिडेंसीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेला ॲड. राखोंडे, नितिन चौधरी व महिला प्रतिनिधी डॉ. सौ. जाधव उपस्थित होत्या. यावेळी मॅरॅथॉन स्पर्धेच्या अध्यक्षपदी डॉ. सुकेश झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या हस्ते स्पर्धेतील टी शर्टचे विमोचन करण्यात आले.सर्वप्रथम ॲड. राखोंडे यांनी प्रस्तावना केल्यानंतर डॉ. झंवर यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. ह्या स्पर्धा 21 कि.मी., 10 कि.मी., 5 कि.मी.आणि 3, कि.मी.अशा होणार असून बोथा फॉरेस्ट मधील नक्षत्रबन ते बोरखेड फाटा असा साडेदहा कि.मी.आणि पुन्हा टर्न घेवून नक्षत्रबना पर्यंत अशी 21 कि.मी.चा रन राहणार आहे. 21 कि.मी. स्पर्धेमध्ये वय वर्ष 40 व त्यापुढील वयाच्या व्यक्तीचा समावेश राहील. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेची बुकींग ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 21 कि.मी.साठी एक हजार रुपये , दहा कि.मी.साठी 800 रुपये, पाच की मी. साठी 500 रुपये, तीन कि. मी.साठी 300 रुपये फी आकारण्यात येणार आहे. यामध्ये स्पर्धकाला टी शर्ट, ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी 6 वाजता सुरू होणार आहेत. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र शिल्ड देण्यात येणार आहे अशी माहिती डॉ.झंवर यांनी दिली.
पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकार परिषदेला ॲड. राखोंडे, नितिन चौधरी व महिला प्रतिनिधी डॉ. सौ. जाधव उपस्थित होत्या. यावेळी मॅरॅथॉन स्पर्धेच्या अध्यक्षपदी डॉ. सुकेश झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या हस्ते स्पर्धेतील टी शर्टचे विमोचन करण्यात आले.सर्वप्रथम ॲड. राखोंडे यांनी प्रस्तावना केल्यानंतर डॉ. झंवर यांनी स्पर्धेची सविस्तर माहिती दिली. ह्या स्पर्धा 21 कि.मी., 10 कि.मी., 5 कि.मी.आणि 3, कि.मी.अशा होणार असून बोथा फॉरेस्ट मधील नक्षत्रबन ते बोरखेड फाटा असा साडेदहा कि.मी.आणि पुन्हा टर्न घेवून नक्षत्रबना पर्यंत अशी 21 कि.मी.चा रन राहणार आहे. 21 कि.मी. स्पर्धेमध्ये वय वर्ष 40 व त्यापुढील वयाच्या व्यक्तीचा समावेश राहील. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेची बुकींग ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी 21 कि.मी.साठी एक हजार रुपये , दहा कि.मी.साठी 800 रुपये, पाच की मी. साठी 500 रुपये, तीन कि. मी.साठी 300 रुपये फी आकारण्यात येणार आहे. यामध्ये स्पर्धकाला टी शर्ट, ब्रेकफास्ट देण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी 6 वाजता सुरू होणार आहेत. विजयी स्पर्धकांना प्रमाणपत्र शिल्ड देण्यात येणार आहे अशी माहिती डॉ.झंवर यांनी दिली.
आयर्न मॅन कृष्णप्रकाश प्रसाद राहतील ब्रँड अँबेसेडर
या स्पर्धा नियोजनबध्द पध्दतीने घेण्यात येणार असुन स्पर्धेचे ब्रँड अँबेसेडर म्हणुन बुलडाण्याचे तत्कालीन पोलिस अधिक्षक आणि विशेष पोलिस महा निरिक्षक तथा आर्यनमॅन कृष्णप्रकाश प्रसाद राहणार असल्याची माहिती डॉ. झंवर यांनी दिली. त्यांच्याशी बोलनी सुरू असून ते उपलब्ध न झाल्यास औरंबादचे आर्यनमॅन नितिन घोरपडे किंवा कॉमनवेल्थ स्पर्धेत सिल्वर मेडल विजेते अविनाश साबळे हे राहतील अशीही माहिती यावेळी देण्यात आली. स्पर्धेच्या काळात सकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत बोथा मार्ग पुर्णतः वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतुक उन्द्री मार्गे वळविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे बुलडाणा अर्बनच्या वतीने कोरोनाच्या आधी अशी फॉरेस्ट रनर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्ष ही स्पर्धा झाली नाही. बुलडाणा जिल्ह्यात चांगले रनर आहेत त्यांच्या उत्साह वाढविण्या बरोबरच स्पर्धकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नावलौकीक मिळवावा म्हणून अशा स्पर्धा आवश्यक असल्याचे डॉ. झंवर म्हणाले.