डोणगाव येथील ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वात मोठे ग्रामपंचायत असून लोकसंख्येच्या बाबतीत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. त्यामुळे सफाई कामगारांना आठवडाभर काम करावे लागते. आणि गाव साफ व स्वच्छ ठेवावे लागते परंतु एवढे करून देखील स्वच्छता कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचे पगार ह्या ग्रामपंचायत प्रशासनाकडून सात ते आठ महिन्यापासून थकीत आहे आहे. ही खूप निंदनीय बाब आहे. त्यामुळे सफाई कर्मचारी यांच्या थकीत असलेल्या पगारी तात्काळ करण्यात याव्या अशी आशयाचे मागणी ग्रामविकास अधिकारी रिंढे व डोणगावच्या सरपंच यांना करण्यात आली आहे.ही मागणी भारतीय जनता पार्टीचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा कोअर कमिटीचे सदस्य अर्जुनराव वानखेडे यांच्या मार्गदर्शनात व सागर भाऊ बाजड युवा तालुका अध्यक्ष कि.आ.भाजपा मेहकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. सदर सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारी या आठ दिवसात न झाल्यास भारतीय जनता पार्टी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी निवेदन देताना ज्योतीताई बुरखंडे तालुकाध्यक्ष महिला आघाडी, आकाश बाजड युवा नेते,भगवानराव बाजड ग्रा.पं. सदस्य, आखाडे बाई ग्रा.पं. सदस्य, कयूम बागवान ग्रा.पं. सदस्य,विशाल बाजड सामाजिक कार्यकर्ते,मंगेश बोरकर,वैभव मोहिते,संदीप वाकुडे, स्वप्निल मोरे अक्षय काळे,प्रदीप खोडके,सिद्धार्थ वाठोरे, रामा इंगळे,अमोल बाजड,विष्णू श्रीनाथ, ज्ञानेश्वर मोरे व अनेक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 1