महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदी सौ.ज्योतीताई अशोकराव पडघान .

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा प्रतिनिधी : दि.२० सप्टेंबर रोजी मोहसिन खान बिसमिल्ला खान यांनी मेरा बु” येथील मा.जिल्हा परिषद सदस्या तथा मा.महिला व बालकल्याण सभापती सौ. ज्योतीताई अशोकराव पडघान यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. सदर नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मा.आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली आहे. मागील दहा वर्षापासून अशोकराव पडघान व त्यांचे पत्नी सौ.ज्योतीताई पडघान हे दोन्ही दांपत्य मेरा बु” जिल्हा परिषद सर्कलचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांनी या सर्कल मधील एकूण १६ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केले आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन ज्योतीताई यांची महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रदेश प्रतिनिधी पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0 9 4 7 6 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *