गरज भासल्यास लॅम्पी ग्रस्त जनावरांसाठी कोरोंटाईन सेंटर उभारू आ .सौ .श्वेता ताई महाले.

Khozmaster
3 Min Read

चिखली: लम्पि आजाराचा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून येईल त्या ठिकाणी इतर जनावरांना आजार होऊ नये यासाठी गरज भासल्यास कोरोन टाईन सेंटर उभारल्या जाण्याचे सूतोवाच आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली येथे लॅम्पी आजार रोधक मोफत लसीकरण कार्यक्रमात केले . त्या पुढे म्हणाल्या की, चिखली विधानसभा मतदारसंघात कोरोन टाईन सेंटर उभारण्याची गरज भासणार नाही कारण आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले असून येत्या आठ दिवसांत सर्व जनांवरांचे लसीकरण पूर्ण झालेले असणार आहे.             लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या व 17 सप्टेंबर या वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधीमध्ये राज्य सरकारच्या वतीने ” राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ” सेवा पंधरवाडा म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत चिखली येथील अग्रसेन गोरक्षण आणि कोलारा येथे मोफत लम्पि रोधक लसीकरण करण्यात आले.

आ. सौ .श्वेता ताई महाले यांच्या प्रयत्नाने लंपी रोधक मोफत लसीकरण

लम्पी या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होताच आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी चिखली विधानसभा मतदारसंघात मध्ये तातडीने लंपि रोधक लस उपलब्ध करून दिल्याने आतापर्यंत 20 हजार गाय वर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे . तसेच आज चिखली आणि बुलडाणा तालुक्यासाठी जवळपास 26 हजार लसी मिळवुन दिल्याने येत्या आठ दिवसात चिखली विधान सभा मतदार संघातील गाय वर्गीय सर्व जनावरांचे लसीकरण पूर्ण होणे अपेक्षित आहे.

चिखली तालुक्यात एकूण गाय आणि म्हैस वर्गीय 54,000 जनावरे असून त्यात गाय वर्गीय 42 हजार जनावरे आहेत . तसेच बुलडाणा तालुक्यात गाय आणि म्हैस वर्गीय 42 हजार जनावरे असून गाय वर्गीय 32,025 जनावरे आहेत.

यातील चिखली तालुक्यातील आजार ग्रस्त गावात आणि आजार ग्रस्त गावाच्या पाच किलोमिटर भागात अधिकृत प्राप्त माहितीनुसार 16,000 गाय वर्गीय तर बुलडाणा तालुक्यात 5000 जनावरांचे लसीकरण जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले असून दि 18/9/2022 रोजी चीखली तालुक्याला 11,000 तर बुलडाणा तालुक्याला 15,000 लसी उपलब्ध करुन दिल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात आज मिळालेल्या लसी टाकल्यानंतर चिखली तालुक्यात 27,000 तर बुलडाणा तालुक्यातील 20,000 जनावरांचे लसीकरण पूर्ण होणार आहे. या दरम्यान बऱ्याच पशु पालकांनी बाजारातून लस खरेदी करून सामायिक स्वरूपात वर्गणी करून आपापल्या जनावरांचे लसीकरण करून घेतल्याची माहिती आहे. बाजारात 700 रुपयांना 100 लसिंची बॉटल मिळते. म्हणजेच एक लस 7 रुपयांना पडते.

 

0 9 4 7 6 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *