आ सौ श्वेता ताई महाले यांनी दिव्यांगापर्यंत सेवा देण्याचे कार्य करीत

Khozmaster
4 Min Read

डॉ तेजराव नरवाडे   धाड: शासकिय कामे करतांना कामे कशी होतात हे सांगण्याची गरज नाही. ” शासकिय काम आणि सहा महिने थांब ” अशी म्हण प्रचलित झालेली आहे. शासकिय कामे सुचारू पध्द्तीने आणि मर्यादित वेळेत व्हावी व्हावी यासाठी शासनाने नियम आणि निकष जरी केलेले असले तरी नागरिकांची कामे वेळच्या आत होत नाही . त्यामूळे नागरिकांना अनेक हेलपाटे मारावे लागतात. धडधाकट माणसाला कामासाठी काय काय करावे लागते एव्हढे कष्ट घ्यावे लागतात तर दिव्यांग व्यक्तींना कोणते दिव्य लागत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. खऱ्या आणि गरजू दिव्यांग व्यक्तींना ते दिव्यांग असल्याचे प्रमाण पत्र मिळत नाही ही शोकांतिका असुन दिव्यांगाच्यां याच शोकांतिकेचा अंत करण्याचा प्रण आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांनी केला आहे . दिव्यांगाना प्रमाणपत्र मिळण्यासाठीच आ सौ श्वेता ताई महाले यांनी दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित करून दिव्यांगापर्यंत सेवा देण्याचे कार्य त्या करीत असल्याचे प्रतिपादन डॉ तेजराव नरवाडे यांनी धाड येथे आयोजित दिव्यांग तपासणी शिबिराच्या अध्यक्षीय भाषणात केले.              भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या व 17 सप्टेंबर या वाढदिवस ते महात्मा गांधीजी यांची जयंती 2 ऑक्टोबर हा कालावधीमध्ये राज्य सरकारच्या वतीने ” राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ” सेवा पंधरवाडा म्हणून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे. त्या अंतर्गत दि 20/9/2022 रोजी धाड ग्रामीण रुग्णालय येथे भव्य दिव्यांग तपासणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराचे उद्घाटन अंकुशराव पाटील यांच्या हस्ते मोठया उत्साहात पार पडले.           यावेळी डॉ सुशीकुमार चव्हाण, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राठोड साहेब, स्रीरोग तज्ञ डॉक्टर सावजी साहेब, मानसोपचार तज्ञ डॉक्टर खर्चे साहेब, डॉक्टर मुळे साहेब, डॉक्टर जाधव साहेब, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर बगाडे साहेब, फिजिओथेरपी तज्ञ डॉक्टर इंगळे साहेब, स्थानिक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवकर साहेब या तज्ञांनी दीव्यांग नागरिकांची तपासणी केली. शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद, 205 दिव्यांगांची झाली तपासण”  राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता ” सेवा पंधरवाडा निमित्त आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून चिखली ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित दिव्यांग तपासणी आणि दिव्यांग प्रमाणपत्र वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 44 नेत्र , 112 अस्थिव्यंग, कान,नाक,घसा 40, मानसोपचार 9, अशा 205 विवीध दिव्यांगांची तपासणी करण्यात आली असून त्यांचे सर्व कागद पत्रे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.          यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते अंकुशराव पडघान, श्याम वाकतकर, श्रीरंग यंडोले, डॉ. तेजराव नरवाडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, भाजपा तालुका उपाध्यक्ष विष्णु पाटील वाघ, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल जाधव, धाड शहराध्यक्ष विशाल विसपुते, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष किरण धंदर, विधी मोर्चा जिल्हाध्यक्ष मोहनदादा पवार, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप उगले, युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश बाजी व सिद्धु लडके, भाजपा तालुका कोषाध्यक्ष किरण सरोदे, भाजपा तालुका उपाध्यक्ष देवेंद्र पायघन व पुरुषोत्तम भोंडे, ओबीसी मोर्चा तालुका सरचिटणीस राजु अपार, सोशल मीडिया तालुका संयोजक अभिषेक वायकोस, अनु.मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राजु नाटेकर, दिव्यांग आघाडीचे नेते रामेश्वर आल्हाट, भाजपा तालुका सचिव अरुण भोंडे व समाधान आघाव, जेष्ठ नेते तेजराव जाधव, बाबुराव ताठे, बबन सुसर, युवा नेते निलेश गुजर, प्रवीण वाघ, प्रमोद ताठे, म्हसला बु. उपसरपंच अमोल उबाळे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस समाधान मुरकुटे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष जयेश पडोळ व पंजाब नरोटे, भिमराव ताठे, सुरेश सुसर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 9 4 7 6 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *