समर्थ कृषी महाविद्यालयात कृषी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाची स्थापना.

Khozmaster
2 Min Read

_प्रतिनीधी रवि मगर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे महाविद्यालयाचे अध्यक्ष देवानंद कायंदे व प्राचार्य नितीन मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन कक्षाची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले. नुकत्याच राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्ष मुंबई, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे द्वारा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक पूर्व परीक्षांचे निकाल जाहीर झाले, सद्यस्थितीमध्ये कृषी व संबंधित विषयासाठी केंद्रीयकृत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे, महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ, सर्व शासकीय व कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावरील महाविद्यालयांमध्ये बीएससी कृषी (ऑनर्स) प्रथम वर्षाचे प्रवेशासाठी पात्र विद्यार्थीनी दि 25 सप्टेंबर 2022 पासून www.mcaer.org तथा www.mahacet.org या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन आवेदन पत्र भरून सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे. विद्यार्थ्यांच्या मेरिटनुसार दिनांक 11, 18 व 28 ऑक्टोबर 2022 तथा रिक्त जागांसाठी चा स्पॉट राऊंड 4 नोव्हेंबर 2022 ला नियोजित आहे, सोबतच महाविद्यालयातील संस्थास्तरीय जागेसाठी प्रवेश फेरी ही दिनांक 6 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होईल असे प्रस्तावित आहे. सद्यस्थितीमध्ये कृषी या विषयाला पूर्ण भारत देशामध्ये देखील चांगला कल उपलब्ध झालेला आहे राष्ट्रीय संस्था, कृषी विज्ञान केंद्र व कृषी आधारित विविध उद्योगात कृषी स्नातकांना चांगला वाव व प्रगती करण्यासाठी संधी देखील उपलब्ध आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अ दर्जा प्राप्त (सांकेतिक कोड 11151) समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे प्रवेश प्रक्रिया संदर्भात अधिक माहितीसाठी प्रा नारायण बोडके 8805215252, प्रा मोजितसिंह राजपूत 9922077502, प्रा विलास सातपुते 9923575685, प्रा किरण ठाकरे 9423363128 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहत्रे यांनी प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांना केले आहे

 

0 9 4 7 6 1
Users Today : 1
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *