अवैध वाहतूक , चालकाविरोधात गुन्हा दाखल…

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार -: धुळे – सुरत महामार्गावर जनावरांची निर्दयतेने कोंबून अवैध वाहतूक करतांना आढळून आल्याने वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , धुळे – सुरत महामार्ग क्र .६ वर एका पेट्रोल पंपासमोर एका वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनात ( क्र . एम.एच .४१ जी १६२४ ) निर्दयतेने जनावरांची कोंबून अवैध वाहतूक करतांना आढळून आला . पोलिसांनी ४१ हजार रुपये किंमतीचे सात जनावरांची सुटका केली असून वाहन चालक वाहन सोडून पसार झाला .

या बाबत मोहित परमेश्वर अग्रवाल यांच्या फिर्यादी वरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंध अधिनियम ११ ( घ ) , ( ड ) , ( च ) , सह प्राणी संरक्षण अधिनियम १ ९ ७६ ( २०१५ चे सुधारणेसह ) कलम ५ , ५ ( अ ) ५ ( ब ) , ९ , ९ ( ब ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पुढील तपास पोहेकॉ . अरुण कोकणी करीत आहेत .

 

0 9 3 7 3 8
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *