शिर्ला-शिवसेना (शिंदे गट) यांच्या वतीने तहसीलदार साहेब,मा.गटविकास अधिकारी (पंचायत समिती),ग्राम पंचायत शिर्ला, यांना येणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये भाविकांना आणी शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याच्या दयनीय अवस्थे मुळे गैरसोय होऊ नये यासाठी तात्काळ या रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांची आणी शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी या करिता निवेदन देण्यात आले.पातूर शहरातील टी के व्ही चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक तसेच खानापूर मार्गावरील अवस्था अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी या करिता निवेदन देण्यात आले.यावेळी शिंदे गटाचे नव नियुक्त पातूर शहर प्रमुख पवन तायडे,आदित्य इंगळे,शुभम शेळके,तुषार उगले,ऋषिकेश सातव, विवेक इंगळे,अक्षय तायडे,प्रणव येणकर,राहुल तायडे,प्रफुल तायडे,प्रकाश झिमरे आणी इतर कार्यकर्ते उपस्तित होते.
Users Today : 1