आलेगाव प्रतिनिधी
येथील महावीर महाराज आश्रम,महानुभाव पंथीय श्रीकृष्ण आश्रम तथा शिक्षक कॉलोनी श्रीराम मंदिर आदींच्या विकास हेतूने संचालकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन धार्मिक संस्कार स्थळांचे काम तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन बाळापूर विधानसभा मतरदार संघाचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी आलेगाव दौऱ्या दरम्यान विविध संचालकांना आश्वासन दिले.पातूर तालुक्यातील आलेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक धार्मिक संस्कार स्थळ असून, सदर स्थळ ही विकासापासून वंचित आहेत.त्या ठिकाणाचा विकास व्हावा या अनुषंगाने आमदार नितीन देशमुख यांनी संत महावीर महाराज आश्रम,महानुभाव पंथीय श्रीकृष्ण आश्रम तथा शिक्षक कॉलोनी येथील श्रीराम मंदिर आदी संचालकांच्या भेटी घेऊन विकास कामा संदर्भात समस्या समजून घेऊन संत महावीर महाराज आश्रमा करीत १५ लक्ष रु तसेच महानुभाव पंथीय श्रीकृष्ण आश्रम करिता आश्रम ते बसथांबा पर्यन्तचा रस्ता मुख्यरस्त्याला जोडणे तसेच आठवडी बाजारातील रस्त्यावरील खाटीक व्यवसायिकांचा खुल्या जागेतील दुकाने दिसू नये व दुर्गंधी पसरू नये म्हणून भिंतीचे बांधकाम तसेच महानुभाव पंथीय लोकां कारिता स्वतंत्र स्मशानभूमी करिता जागा उपलब्ध व्हावी या करिता आमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ रामेश्वर पुरी यांच्या सोबत दि २४ शनिवार रोजी बैठक घेण्याचे ठरले.तसेच शिक्षक कॉलोनी मधील श्रीराम मंदिरा करिता सभागृह तसेच मोठ्या लाईटाची व्यवस्था येत्या सहा महिन्यामध्ये पुर्ण करण्याचे आश्वासन उपस्थित शिक्षकांना आमदार महोदयांनी दिले.या वेळी महावीर महाराज आश्रम श्रीकृष्ण आश्रम तसेच शिक्षक आदींनी मा आमदार नितीन देशमुख यांना शॉल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या वेळी शाखा अभियंता वामन राठोड, शिवसेना पातूर तालुका प्रमुख रवींद्र मूर्तडकर, कुशोर राऊत,निलेश कापकर,श्रीकांत सेवणेकर,नितीन ढोणे,नवल काठोळे,विजय मूर्तडकर,पत्रकार श्रीधर लाड व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Users Today : 1