प्रतिनिधि आलेगाव संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ.प्रविण भोटकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे रुग्णसेवकबंधू मित्र हे गोरगरीब रुग्णांना नवजीवन देणे हेच ध्येय समोर ठेवून समाजासाठी अहोरात्र कार्यरत असतात. जालना जिल्ह्यामधील धोंडीबा आगुने या साधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या पेशंटला रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कायमस्वरूपी ऑक्सिजन लागेल . व याचा खर्च साधारणतः दररोज पाच ते सहा हजार येणार आहे .असे डॉक्टरांनी सांगितले आर्थिक परिस्थिती सर्व सामान्य असल्यामुळे धोंडीबा आगुने हे एवढा खर्च करू शकणार नाहीत. हि गोष्ट मंगेश चिवटे व संघटनेचे प्रदेश सरचिटणीस मंगेश केणेकर यांना समजताच त्यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भोटकर यांच्याशी चर्चा करून व त्यांचे मार्गदर्शन घेऊन मराठवाड्यातील समाजसेवक दादासाहेब येडे मराठवाडा वैद्यकीय कक्ष प्रमुख यांच्या पुढाकाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कँलीफोर्निया या देशामधून ऑक्सिजन मशीन मोफत मिळवून दिली .व आता घरीच या पेशंटवर मोफत उपचार होत आहे.हि अतिशय कौतुकास्पद बाब आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे योगदान खूप महत्वाचे आहे संघटनेचे मार्गदर्शक आ. भोटकर सर समाजसेवक श्री.दादासाहेब येडे यांनी पाठपुरावा करून मशीन उपलब्ध करून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मंत्रालयात चर्चा केली. याबद्दल त्यांचे सुद्धा मानावे तेवढे आभार कमीच. असे उदगार त्यांचे मुलाने व्यक्त केला आहे संघटनेचे मंगेश भाऊ केणेकर मंगेश भाऊ चिवटे यांचे जनता धन्यवाद व आभार व्यक्त करत आहे रुग्णाच्या नातेवाईकांनी तसेच गावकर्यांनी सुध्दा संघटनेच्या सामाजिक कार्याबद्दल आभार मानले.व आम्हांला मानसिक आधार दिला. मदत केल्या बद्दल तसेच घरीच आँक्सीजन मशीन उपलब्ध करुन दिल्याबद्दल खूप खूप आभार मानले.
Users Today : 1