प्रतिनिधी अशोक भाकरे
बाळापूर तालुक्यातील
पोलीस स्टेशन उरळ ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांना दिनांक 25/9/22 रोजी सकाळी दरम्यान गुप्त बातमीदाराने माहिती दिली की ग्राम अंत्री मलकापूर येथून निंबा फाटा कडे दोन इसम त्यांच्याजवळ असलेले मालवाहक गाडीमध्ये गोवंश गाईंना निर्दयतेने वागणूक देत बांधून कोंबून कत्तलीकरिता घेऊन जात आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून तात्काळ पथक रवाना करून निंबा फाटा येथे संशयित वाहन अशोक लेलँड कंपनीचे मालवाहक गाडी क्रमांक MH.30.BD.4971 किंमत पाच लाख असे वाहन थांबून पाहणी केली असता त्यामध्ये दोन गाय व एक वासरी असे गोवंश किंमत 50,000/- निर्दयतेने कत्तली करिता घेऊन जाताना मिळून आले आरोपी 1) शेख इर्शाद शेख उस्मान वय 36 वर्ष,2) वशिम शहा इनायत शहा वय 36 वर्ष दोन्ही राहणार इंदिरानगर वाडेगाव बाळापूर जिल्हा अकोला यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन उरळ येथे प्राण्यांना निर्दयतेने वागणूक अधिनियम 1960 कलम 11 आणि कलम 5 ब 5 ब 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 सुधारित कायदा 1995 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे व आरोपींना अटक करून पुढील तपास कार्यवाही सुरू आहे कार्य व कार्य करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार पीएसआय राजेंद्र मोरे गोपनीय पोलीस शैलेश घुगे , गजानन ठोंबरे चालक इंगळे मेजर यांनी कार्यवाही केली.