उद्योग विभाग व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 29 व 30 सप्टेंबर रोजी उद्योजकांसाठी कार्यशाळा
अकोला – उद्योग विभाग व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उद्योजकांसाठी दोन दिवशीय कार्यशाळा दि.अकोला अर्बन को ऑपरेटीव्ह, बँक हॉल, तोष्णीवाल ले आउट अकोला येथे दि. 29 व 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यशाळेत उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत गुंतवणुक वृध्दी, निर्यात प्रचलन आणि एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. उद्योजकांना येणाऱ्या समस्यांबाबत परिसंवादाव्दारे समस्या सोडविणेबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तसेच उद्योग विभागाचे सहकार्याने उद्योग सुरु केलेल्या उद्योजकांचे उत्पादनांचे प्रदर्शन या ठीकाणी लावण्यात येणार आहे. तरी उद्योजकांनी कार्यशाळा व प्रदर्शनीला मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी केले आहे.
उद्योजकांसाठी दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन
0
8
9
4
5
6
Users Today : 22
Leave a comment