प्रतिनीधी रवि मगर
: डाॅ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला सलंग्न समर्थ कृषि महाविद्यालय देऊळगांव राजा येथे केद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये 361 रँक मिळविणारे महाराष्ट्र कॅडर आईपीएस अधिकारी अनिल रामदास म्हस्के यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी श्री गजानन महाराज कृषि व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष देवानंद कायंदे, मा. जि. प. अध्यक्षा नंदाताई कायंदे, जि. प. सदस्य तथा महाविद्यालयाचे संचालक मनोज कायंदे, रामदास म्हस्के, लक्ष्मीताई म्हस्के, मीनल चोधारी-म्हस्के, समर्थ कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य नितिन मेहेत्रे, नीट परीक्षा उत्तीर्ण कु. ईश्वरी कोल्हे, दत्तात्रय कोल्हे, समर्थ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल ताठे, उपस्थित होते.
देशातील सगळ्यात कठीण परीक्षा म्हणजे यूपीएससी परीक्षा ही परीक्षा पास होण्यासाठी अंगी प्रचंड मेहनत व जिद्द असावी लागते, असे प्रतिपादन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण देऊळगाव राजा परिसरातील गिरोली येथील अनिल म्हस्के यांनी केले, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथे सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना त्यानी त्यांचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा, गिरोली येथुन झाले,माध्यमिक शिक्षण देउळगांव राजा हायस्कुल देउळगांव राजा येथे तसेच 11 वी व 12 वी औरंगाबाद येथे व बि.ई. मेकॅनिकल इंजिनिअरींग पुणे येथून पूर्ण करून युपीएससी परीक्षेमध्ये 361 वी रँक प्राप्त केली. तसेच त्यांनी 2019 मध्ये आयएफएस परीक्षा 59 व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. याप्रसंगी त्यांना मूलाखती दरम्यान विचारली गेलेली प्रश्न व त्याला दिलेली उत्तरे याबद्दल सविस्तर चर्चा उपस्थित विद्यार्थ्यान सोबत केली व मसुरी येथे प्रशिक्षण घेत असतांना आलेले अनुभव तसेच हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस प्रशिक्षण संस्थेत आलेले आपले अद्भुत अनुभव सांगितले व शेवटी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी करण्यासाठी प्रोत्साहीत केले तसेच विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचे आव्हान करत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील उत्तरे दिली. प्रसंगी मीनल चौधरी-म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना बँक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी सांगितल्या, यावेळी कु. ईश्वरी कोल्हे यांनी नीट परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. समर्थ कृषी महाविद्यालयात आयोजित सत्कार समारंभाच्या अध्याक्षा नंदाताई कायंदे यांनी याप्रसंगी आयपीएस अधिकारी अनिल म्हस्के यांच्याप्रमाणेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढून ठरवलेले ध्येय गाठावे असे आव्हान केले, या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मान्यवरांचा सखोल परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी उपस्थितांना करून देत महाविद्यालयाचा उंचावणारा आलेख विषद केला, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी जाधव यांनी केले,
या सत्कार समारंभास समर्थ कृषि महाविद्यालय व समर्थ औषधनिर्माणशास्त्राचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Users Today : 47