चिखली (प्रतिनिधी )
विदर्भाला महाराष्ट्रामध्ये सामील करून घेतेवेळी २८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर कराराने विदर्भाला महाराष्ट्रात सामील करून घेतले गेले. मात्र, या कराराच्या ११ ही कलमांचे महाराष्ट्राने पालन केले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भावर अन्यायाची मालिका उभारली. त्याचा निषेध म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे चिखली शहरातील तहसील कार्यालया समोर नागपूर कराराची होळी करण्यात आली.
विदर्भ महाराष्ट्रात सामील करतेवेळी जो करार झाला त्या करारा नुसार लोकसंख्येच्या आधारावर २३%नोकऱ्या, महाराष्ट्राच्या बजेटच्या 23 टक्के विकास निधी, सिचंन करण्यात येईल असे ठरवले होते मात्र तो करार पाळला गेला नाही विदर्भाच्या वाट्याच्या नोकऱ्या, सिचंनाच्या योजना स्वार्थी नेत्यांनी स्वतःच्या भागात पळवल्या मुळे विदर्भाच्या तोंडाला पाने पुसली परिणामी विदर्भातील शेती कोरडवाहू राहिली त्यामुळे लहरी निसर्गाच्या भरवशावर विदर्भातील शेतकऱ्याचे वाटोळे झाले, सुशिक्षित तरुणामध्ये बेकारी वाढली विदर्भातील काही जिल्ह्यातील सुशिक्षित बेकार तरुण नक्षली चळवळीत सामील झाले.
विदर्भात मुबलक खनिज संपत्ती आहे,सुपीक जमीन आहे, वीजनिर्मिती केंद्रे आहे तरीही देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या विदर्भात झाल्या आहे.
डॉक्टर बाबासाहेब आबेंडकर आणि शेतकरी नेते शरद जोशी यांनी छोट्या राज्याबद्दल सकारात्मक विचार मांडलेले आहे. छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांनी विकासाच्या दिशेने आगेकूच करीत आहे म्हणून विदर्भ राज्य वेगळे करण्यात यावे जेणेकरून आम्हा विदर्भातील जनतेवरील अन्याय थांबेल असे मत नामदेवराव जाधव आणि समाधान कणखर यांनी व्यक्त केले.
चिखली तहसील कार्यालयाच्या गेट मध्ये नागपूर जराराची होळी करताना विदर्भवाद्यांनी ‘जळाला रे जळाला, फसवा करार जळाला’, ‘लेके रहेंगे लेके रहेंगे, विदर्भ राज्य लेकर रहेंगे’ ,
“असे कसे देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही”अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात नामदेवराव जाधव, समाधान कणखर, देविदास कणखर,उध्दव पाटील ,विलास मुजमुले, शेषराव पाटील शेळके,मुरली महाराज येवले, विजय वाघमारे,परमेश्वर येवले,प्रकाश घुबे,अनिल चव्हाण, राजू शेळके,दौलत पाटील,राहुल शेळके,रावसाहेब अंभोरे,भागवत नरवाडे यांच्यासह विदर्भवाद्यांनी भाग घेतला.
बेरोजगारी
– नागपूर कराराच्या अभिवचनाप्रमाणे २३ टक्के नोकऱ्या विदर्भातील तरुणांना देण्याचे कबूल केले होते. मात्र, याउलट चार लाखांहून अधिक नोकऱ्या पळविल्या. त्यामुळे विदर्भात बेरोजगारांची फौज निर्माण झाली आहे. सोबतच विदर्भात कारखाने उभारण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात युवकांचे पलायन झाले, असे सांगत याचाही निषेध
Users Today : 47