Friday, September 13, 2024

डोळ्यामध्ये मिरची पूड टाकून ४ लाखापेक्षा अधिक रकमेची लूट ; अज्ञात आरोपीवर किनगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सिंदखेडराजा सुरेश हुसे

स्प्लेंडर मोटरसायकलने सिनेस्टाईल पाठलाग करून आणि डोळ्यात मिरची पावडर टाकून एकूण ३ चोरट्यांनी किनगावराजा येथील विष्णू पंढरीनाथ काकड यांच्याजवळील सुमारे ४ लाख ४३ हजार ३७२ रुपयांची रोख रक्कम लुटली असून या घटनेने किनगावराजा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
फिर्यादी विष्णू काकड हे येथील टापरे सुपरमार्केट दुकानात कामावर असून दिनांक १९ ओक्टॉबर रोजी बीबी,मलकापूर पांग्रा व दुसरबीड येथून उपरोक्त रक्कम घेऊन येत असतांना संध्याकाळी ६.१५ च्या दरम्यान  तढेगाव फाटा ते राहेरी पुला दरम्यान विष्णू काकड यांच्या मागावर असलेल्या हिरो स्प्लेंडर मोटर सायकलवरून अज्ञात ३ चोरट्यानी विष्णू काकड यांच्या गळ्यातील डिक्कीवर असलेली पैशाची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला.यावेळी चोरट्यांना प्रतिकार करतांना काकड खाली पडले असता चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्याजवळील बॅगेतील एकूण ४ लाख ४३ हजार ३७२ रुपयांची रोख रक्कम लुटली व घटनास्थळावरून पोबारा केला.
विष्णू काकड यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचे पोलीस ठाण्यात कथन केले असता त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात ३ चोरट्यांवर किनगावराजा पोलीस ठाण्यात कलम ३९४,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तात्पुरता प्रभार स्वीकारलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज रबडे व पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश गोरे हे पुढील घटनेचा तपास करीत आहेत.

- Advertisement -
अन्य बातम्या
Live Tv
Advertisement
  • site logo
Polls
मौसम का हाल
Latest news
Live Scores
Rashifal
Panchang