पुण्यात मद्यधुंद पीएमपीएल चालकाने राँग वेवरुन बस चालवली, १०-१५ वाहनांना धडक; थरारक घटनेने शहर हादरलं

Khozmaster
1 Min Read

पुण्यातील गजबजलेल्या आणि अत्यंत वर्दळीच्या वेताळ चौकात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रस्त्यावरुन पुणे महानगरपालिका अर्थात पीएमपीच्या एका चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस चालवल्याचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी हा प्रकार घडला. मद्यधुंद अवस्थेत बस चालवणाऱ्या चालकाची ओळख पटली असून त्याचे नाव निलेश सावंत असे आहेनिलेश सावंत याने सेनापती बापट मार्गावर विरुद्ध दिशेने (राँग वे) बस चालवत नेली. त्याने वेताळ चौकाच्या परिसरात उलटी बस चालवत जवळपास दहा ते पंधरा गाड्यांना धडक दिली. हा सगळा प्रकार घडला तेव्हा बसमध्ये तब्बल ५० प्रवाशी होते. हा सगळा प्रकार लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरड करत मदतीसाठी धावा सुरु केला. या सगळ्यांचा जीव धोक्यात टाकत मद्यधुंद अवस्थेतील निलेश सावंत पीएमपीएलची बस मागचापुढचा कोणताही विचार न करता चालवत होता. या अपघातामध्ये काही प्रवाशी आणि वाहनचालकांना दुखापत झाली आहे. जखमींचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही. तुर्तास कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पोलिसांकडून आता चालक निलेश सावंत याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याल आला असून तपासाला सुरुवात झाला आहे. याप्रकरणात आता प्रशासन आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *