मॅडमजवळ २ हजाराच्या नोटा, त्यांना सुट्टे हवेत, जिल्हाधिकारी कार्यालयात घडली धक्कादायक घटना

Khozmaster
3 Min Read

 जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय हादरलं. आणि पोलिसांना तातडीने धाव घ्यावी लागली. एका भामट्या व्यापाऱ्याचे दोन लाख १० हजार रुपये घेऊन पळाला. हे जिल्हाधिकारी कार्यालयाला माहितच नाहीजिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कपड्याचे वाटप करायचे आहे, असे म्हणत व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना पाचशे पाचशे रुपयांचे सुट्टे पाहिजे आहेत, असे सांगून संबंधित व्यापाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात आणले. आणि त्याच्या जवळील २ लाख १० हजार रुपयांची रोकड घेवून भामटा पसार झाला.हा प्रकार गुरुवारी २७ एप्रिलला दुपारी चार वाजेच्या सुमारास परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात घडला. जिल्हाधिकारी यांच्या नावाचा वापर करून भामट्याने कपडा व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आता भामट्याचा शोध घेत आहेत.सदर घटनेविषयी दुकान मालकाने दिलेली माहिती दिली आहे. कैलास तुलसानी यांचे परभणी शहरात शगुन कलेक्शन या नावाचे दुकान आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एक ३२ वर्षीय इसम त्यांच्या दुकानात आला. संबंधिताने मी जिल्हाधिकाऱ्यांचा पी.ए. आहे. जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी काही कपडे घ्यायचे आहेत, असे म्हणून सॅम्पल दाखविले. त्यानंतर दुकान मालकाने दोन नमुने आपल्या दुकानातील नोकराकडे देवून संबंधित इसमासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले. या ठिकाणी भामट्याने आपण कार्यालयीन कर्मचारी आहोत, असे वागत अधिकाऱ्यांच्या दालनात ये-जा केली. त्यानंतर संबंधित भामटा नोकरासोबत पुन्हा शगुन कलेक्शन या दुकानावर आला.जिल्हाधिकाऱ्यांना कपडे पसंत पडले असून ४५ ड्रेस काढण्यास सांगितले आहेत. याचे बिल ९० हजार झाले. जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन हजारांच्या नोटा आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना पाचशे रुपयांच्या नोटांमध्ये चिल्लर हवी आहे. तुम्ही काही रक्कम सोबत घ्या, असे म्हणून दुकान मालक कैलास तुलसानी यांना २ लाख १० हजार रुपये सोबत घेण्यास सांगितले.दुकान मालक, भामटा हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या ठिकाणी भामट्याने विश्वास संपादन करत दुकान मालकाजवळून २ लाख १० हजार रुपये घेतले. फोनवर बोलण्याचा बहाना करत भामटा रक्कम घेवून निघून गेला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर घडला प्रकार कैलास तुलसानी यांनी मित्र मंडळींना सांगितला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकालाही माहिती देण्यात आली. भामटा सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आणि परभणी पोलीस त्याचा तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक स्थानिक गुना शाखेचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *