बीड: भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर बीडच्या आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल माध्यमावर वायरल झाला असून व्हिडिओची फॉरेनसिक तपासणी करण्याची मागणी आमदार धस यांनी केली. शेतात मका काढणाऱ्या महिलेला मारहाण करण्यात आली. यात तिचा विनयभंग ही केला गेला.
ही घटना १५ ऑक्टोबर रोजी आष्टी तालुक्यातील वाळुंज येथे उघडकीस आली. याप्रकरणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघां विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या घटनेचा कधीत व्हिडिओ देखील सध्या सोशल माध्यमातून व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसणारी पीडिता शेतात मका काढत होती. याच वेळी गावातील रघु पवार आणि राहुल जगदाळे हे तिथे आले आणि त्यांनी पीडीतेला मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग गेला. याच ठिकाणी पीडीतेची सून धावत आली तिने हा व्हिडिओ तयार केला. याच ठिकाणी प्राजक्ता धस देखील होत्या. त्यांनी पीडितेला मारहाण करा असे सांगितले. दरम्यान आता या सर्व प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.