आश्रमशाळेतील मुलांची झोपायची तयारी, पण गादी उचलताच सगळे हादरले, १२ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Khozmaster
1 Min Read

राज्यातील आश्रमाशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत असतानाच वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धे येथील कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथील यादवरावजी केचे आश्रम शाळेत एका मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या मुलाचा मृत्यू संशयास्पद असल्याने याप्रकरणातील गुढ वाढले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आश्रमशाळेत असणाऱ्या गादीखाली या मुलाचा मृतदेह सापडला. ही आश्रमशाळा आर्वी विधानसभेचे भाजपा आमदार दादाराव केचे यांची असल्याची समजते.

मृत विद्यार्थ्याची ओळख पटली असून त्याचे नाव शिवम सनोज उईके असे आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील चिखलदरा तालुक्याच्या डोमा येथील होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता तो दिसला होता. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास शाळेतील विद्यार्थी झोपण्याची तयारी करत होते. त्यासाठी मुलं नेहमीच्या जागेवरुन गाद्या काढत होती. तेव्हा एका गादीखाली शिवमचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार समोर आल्यानंतर आश्रमशाळेत एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच कारंजा घाडगे पोलीस घटनास्थळी दाखल झालेघटनेची माहिती समजताच मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधत घटनेची कसून चौकशी करण्याची विनंती केली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेता. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यामधून शिवमच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यामुळे आता आगामी काळात तपासातून कोणती माहिती समोर येणार, हे पाहावे लागेल..
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *