प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर ते वाशिम रोडस्थित असलेल्या पातूर घाटात दुचाकीची दुभाजकाला जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.
पातूर पासून वाशिमकडे जाताना सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पातूर घाटात दि.१९/११/२०२३ रोजी सकाळी सुमारे सात वाजताच्या दरम्यान अकोल्याकहुन काही मित्रांसोबत धोदानी धबधबा पाहायला जात असलेल्या दुचाकीस्वाराची दुचाकी दुभाजकावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अकोल्यातील गौरांग हेमंत आंबेकर (वय २०) हा आपल्या मित्रांसोबत पातूर जवळील धोदानी धबधबा पाहायला जात असतांना पातूर घाटात अचानकपणे दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून दुभाजकावर आदळल्याने त्याच्या छातीत गंभीर मार लागला यात त्याचा जागीच मृत्यू झाला असून अपघात झाल्याचे कारने सोबत असलेल्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी मृतक गौरांग आंबेकर यास ओझोन हॉस्पिटल अकोला येथे नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
अकोला – वाशिम मार्ग हा अक्षरशः मृत्यूचा मार्ग ठरत असून एकाच जागेवर झाला पाचव्यांदा अपघात झाला आहे.दि.२७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास पातूर घाटात ट्रक पलटी झाला असून या अगोदर दि.१८ एप्रिल रोजी याच जागी दोन ट्रकची समोरासमोर टक्कर झाली होती,त्यानंतर १४ जून रोजी याच ठिकाणी निजामाबाद ते राजस्थान बिडी बंडल घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याच्या लागोपाठ जुलै महिन्यात देखील याच जागेवर एक आणखी ट्रक पलटी झाला होता त्याच जागेवर आणि आजचा हा अपघात झाला असून एकाच जागेवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या जागेबाबत ना-ना तऱ्हेच्या चर्चा होताना दिसत असून येथे अपघात प्रवण स्थळाचे फलक लावण्याची गरज आहे.त्याचप्रमाणे गेल्या महिनाभरात अकोला पातूर रोडवर उडानपुलाजवळ एक दांपत्य जागीच ठार झाले होते, त्याअगोदर नांदखेड फाट्यावर एकदिवस आड झालेल्या दोन अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता.महिनाभरा अगोदर पातूर घाटात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली होती आणि आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती घडली असून गौरांग आंबेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र आज झालेल्या अपघाताबाबत पातूर पोलीस अनभिज्ञ असून वृत्त लिहिस्तोवर सदर अपघाताची पोलीस दप्तरी कुठलीही नोंद नव्हती.