प्रतिनिधी – सुरज आबाचने
उमरगा – शासनाने आपले सर्व सेवा केंद्र प्रकल्पतील संगणक परिचारकांच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी १७ नोव्हेंबर २०२३ पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायती मध्ये महाराष्ट्र राज्य संगणक परिचारक संघटनेचेच्या वतीने बेमुदत कामं बंद आंदोलन करण्यात येत आहे. संगणक परिचारक यांच्या मागण्या मान्य करण्यात यावे यासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले आहे.तसेच उमरगा तालुक्यातील संगणक परिचारक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या पूर्वीचा संग्राम व संध्याच्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात मागील बारा वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकास विभागाने नेमून दिलेले काम संगणक परिचारक प्रामाणिक पणे करत आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचे कार्य संगणक परिचारक अविरत पणे करत आहेत.
ग्रामपंचायतींचे ऑनलाईन व ऑफलाईन व इतर अनेक प्रकारचे कामे प्रामाणिक पणे करुन सुद्धा केवळ ६ हजार रुपये या महागाईच्या काळात अतिशय तुटपुंजे मानधन मिळते ते ही केव्हाच वेळेवर मिळत नाही. संगणक परिचारक हे ग्रामपंचायत मध्ये बसून सर्व प्रकारचे कामे करत असल्याने त्यांना कर्मचारी दर्जा व किंमन वेतन मिळणे आवश्यक आहे. असे निवेदन उमरगा संगणक परिचारक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत मुळे,तालुकाध्यक्ष प्रमोद बिराजदार ,सचिव श्रीकृष्ण जमादार, उपध्यक्ष अमोल जाधव व संगणक परिचारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 18