छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर -ता,२४
केंद्र शासन व महाराष्ट्र शेजारच्या सहा राज्यासह २४राज्यांनी दि,१जानेवारी,२००६पासून ८० वर्ष वरील
निवृत्ती वेतन धारकांना अतिरिक्त निवृत्ती वेतन वाढ मंजूर केली आहे,यासारखी निवृत्त वेतन वाढ महाराष्ट्र राज्यातील निवृतांना केंद्राच्या दराने व त्याच प्रभावाने
त्वरित मंजूर करावी,उतार वयातील आजारपण,व विविध व्याधीमुळे पेन्शनर्स ना जगण्याची धडपड करावी लागते,औषध खर्च पूर्तता व स्वाभिमानाने जगण्यासाठी ही मागणी शासनाने आपुलकीने व विना विलंब मंजूर करावी अशी मागणी शासनाकडे वैजापूर पेन्शनर्स शाखेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत यांनी केली आहे,राज्यातील सेवा निवृत्त शिक्षकांना दर महिन्याच्या१तारीख ते ५तारीख दरम्यान पेंशन मिळावे,महात्मा जोतीराव फुले जन
आरोग्य योजनेचा लाभ कुठल्याही अटीशिवाय सर्व थरावरील शासकीय व निमशासकीय निवृत्ती वेतन धारकांना देण्यात यावा,तसेच राज्यातील सर्व सेवानिवृताना केंद्र सेवा निवृत्त कर्मचारी वर्गाप्रमाणे
दरमहा वैद्यकीय भत्ता मिळावा२०१६ नंतर निवृत्त प्राथमिक शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या सेवा कालावधीच्या थकबाकी चे हप्ते त्वरित द्यावेत अशी मागणी ही राजपूत यांनी आपल्या निवेदनात केली आहे,या व ईतर मागण्यासाठी राज्यातील सर्व सेवानिवृत्त संघटना निवृत्ती वेतन धारक समन्वय समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे राजपूत यांनी म्हटले आहे, शासनाने या व ईतर सर्व मागण्या त्वरित मंजूर कराव्यात अशी विनंती आहे,(फोटो-पेन्शनर्स संघटना अध्यक्ष-धोंडीरामसिंह राजपूत
Users Today : 14