अश्लील व्हिडिओवरुन ब्लॅकमेल, विश्वस्तांकडून १ कोटीची खंडणी, कृषी सहाय्यक महिलेवर मोठी कारवाई

Khozmaster
2 Min Read

नाशिक : आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या कृषी सहाय्यक महिलेचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. तसेच तिची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे. या प्रकरणातील संशयित सारिका बापूराव सोनवणे (४२) हिने दिंडोरी येथील स्वामी समर्थ अध्यात्मिक पिठाचे विश्वस्त यांच्याकडे दहा लाखाची खंडणी मागितली होती. पैसे घेताना सारिका सोनवणेसह तिचा मुलगा मोहित बापूराव सोनवणे (२५) याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या घटनेनंतर कृषी सहसंचालकांनी सारिका सोनवणे यांच्या निलंबनाचा आदेश काढला असून तिची चौकशी केली जाणार आहे.

स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्राच्या विश्वस्त मंडळातील कार्यकारी सदस्य निंबा मोतीराम शिरसाट (५४) यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्यावरुन वेळोवेळी ‘ब्लॅकमेल’ केले जात होते. त्यांच्याकडून सुमारे १ कोटी रुपयांची खंडणी संशयित मायलेकांनी उकळल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. दरम्यान संशयित सारिका सोनवणे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार असून सेवा काळात कोणा – कोणाची फसवणूक केली आहे का? याची देखील चौकशी आता कृषी विभाग करणार असल्याची माहिती मिळाली आहे. निलंबित सारिका सोनवणे हिच्यासह तिचा भाऊ विनोद चव्हाण, मुलगा मोहित यांना न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.खंडणी प्रकरणातील मुख्य संशयित सारिका सोनवणे नाशिक जिल्हयातील निफाड येथे कृषी सहायक अधिकारी म्हणून कार्यरत होती. गेल्या ४ ऑक्टोबरपासून ती वैद्यकीय रजेवर होती. खंडणीप्रकरणी गेल्या शनिवारी (ता.१८) तिला आणि तिच्या मुलाला अटक झाली होती. आता कृषी विभागाने सारिका सोनवणे हिचं निलंबन केलं असून कृषी विभागात सेवा करत असताना कोणा कोणाची फसवणूक केली होती का ? याची देखील आता चौकशी होणार आहे. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होते हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
0 8 9 4 7 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *