मराठा आरक्षणासाठी दिवसभर साखळी उपोषणाला बसला, सायंकाळी टोकाचं पाऊल उचललं

Khozmaster
2 Min Read

परभणी : सरकारने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करत ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ अशा आशयाची चिठ्ठी लिहून २४ वर्षीय युवकाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गंगाखेड तालुक्यातील पिंप्री झोला येथे गुरुवार २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.
पवन विष्णूकांत भिसे (वय २४ वर्ष रा. पिंप्री झोला) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पिंप्री झोला येथील ग्रामस्थांबरोबर गंगाखेड येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणाला पवन भिसे याने उपस्थिती लावली होती. सायंकाळी गावी परत गेल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे, असं त्याने चिठ्ठी लिहिलं.’एकच मिशन-मराठा आरक्षण’ अशा आशयाची चिट्ठी लिहून खिशात ठेवत पवन भिसे याने घरातील पत्राखालील आडूला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती समजताच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोउपनि. शरद सावंत, टी.टी. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला पवन भिसे याचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात आणला होता.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान परभणी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सात आत्महत्या युवकांनी केल्या असून ही आठवी आत्महत्या आहे.आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत ५५ हून अधिक जणांनी आत्महत्या केली आहे. नांदेडमध्ये यापूर्वी सुदर्शन देवराये, ओमकार बावणे, शुभम पवार यांनी आपले जीवन संपवले आहे. दरम्यान या प्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *