वीज पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू..

Khozmaster
2 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार -: शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील १४ वर्षीय मुलीवर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच तीन जण जखमी असल्याने जखमींना शहादा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
    तसेच मृत सपना हिला शवविच्छेदनासाठी नेले असता डॉ. हजर नसल्याने नातलगांनी आक्रोश व्यक्त केला आहे.
   आ. राजेश पाडवी यांनी डॉक्टररांशी संपर्क केल्याने लागलीच मदतकार्य सुरू झाले.
    सविस्तर माहिती अशी की, शहादा तालुक्यातील जावदा तर्फे बोरद येथील सपना  ठाकरे ही सकाळी ८ वाजे पासून मजुरां सोबत कापूस वेचण्यासाठी गेली होती.
सकाळ पासून ढगाळ वातावरण होते.
   अचानक दुपारी ११ नंतर जोरदार पावसास सुरुवात झाली पावसाबरोबर सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाट झाला त्यावेळी ती व तिच्या जवळ तीन मजूर होते व सर्वजण एका झाडाखाली बसले होते.
 अचानक झाडावर वीज सपना राज ठाकरे ( १४ )  हिच्या अंगावर पडली त्यात तिचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला व एक पुरुष जखमी झाले आहेत ह्यांना रुग्णालयात दाखल केले असून मयत सपना हिला शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले असता रुग्णालयात डॉक्टर नसल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही व जखमींवर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत , मयत झालेल्या सपनाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला व आ. राजेश पाडवी यांच्याशी संपर्क साधला ते ही तेलंगाना येथे पक्षाच्या प्रचारासाठी गेले असताना सुद्धा त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून त्वरित जखमीवर उपचार करण्याचे आदेश दिले.
   मृत्यू पडलेल्या सपना  ठाकरे हीचा मृतदेह नातेवाईकांना देण्यास सांगितले त्यामुळे जावदे येथील ग्रामस्थांनी आमदार  पाडवी यांचे आभार मानले.
0 8 9 4 7 8
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *