पतंजली योग समितीतर्फे नंदुरबार बसस्थानकावरील शिबिरास साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

Khozmaster
2 Min Read
प्रविण चव्हाण
नंदुरबार प्रतिनिधी .योग गुरु रामदेव बाबा संचलित पतंजली योग समिती नंदुरबार आणि बसस्थानक नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इंटिग्रेटेड योग प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती बस स्थानकावर मंगळवारी सकाळी 6 वाजता  योग  प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस आगारप्रमुख संदीप निकम यांनी पुष्प अर्पण केले. याप्रसंगी डॉ.अनिल  शिरसाट उपस्थित होते.
पहिल्या दिवशी योग संदर्भात पतंजलि योग समितीचे नंदुरबार  जिल्हा प्रभारी एन.डी.माळी,भारत स्वाभिमान नंदुरबार जिल्हा प्रभारी नवनीत  शिंदे,यांनी प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण दिले. नंदुरबार तालुका प्रभारी अजयसिंह गिरासे, महीला प्रभारी किरण  राजपूत,भास्कर रामोळे, एस.एन.पाटील, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख महादू हिरणवाळे, यांनी संयोजन केले. प्रमुख अतिथी डॉ.अनिल शिरसाट,
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक सागर पाडवी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक योगेश शिवदे,वाहतूक निरीक्षक अजिंक्य नाटकर, ऋषी पावरा,सहाय्यक वाहतूक निरीक्षक देवेंद्र सूर्यवंशी, दीपक भिल,लक्ष्मण अहिरे,यश कोकणी, दिनेश गायकवाड,दिलीप गायकवाड, संतोष पवार,मोहन गढरी,शरीफ मंसूरी, हिरामण पाटील,अतुल हिरे,फिरोज मन्सुरी, हेमंत मोहिते,योगेश पाटील, सागर बुंदिले, विशाल चिरावंडे,चालक वसईकर,अशोक मुंडे ,गणशीराम सूर्यवंशी, ज्योती साळी, आदींनी परिश्रम घेतले.
पाच दिवसीय योग शिबिरात दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत विविध प्राणायाम आणि योग शिकविण्यात येणार आहेत.नंदुरबार आगारातील चालक, वाहक आणि कार्यशाळेतील कर्मचाऱ्यांनी योग प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन संदीप निकम यांनी केले आहे.
फोटो कॅप्शन  – नंदुरबार येथील पतंजली योग समिती आणि नंदुरबार आगारातर्फे आयोजित योग  प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करताना ज्येष्ठ  योगशिक्षक एन. डी.माळी सोबत आगारप्रमुख संदीप निकम, डॉ. शिरसाट, नवनीत शिंदे, अजयसिंग गिरासे,  आदी.
0 8 9 4 5 6
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *