एजाज खान हजरत पिर पहाडी यात्रेत कुल हिंद मुशायरा कार्यक्रमात रंगली हास्याची मैफील

Khozmaster
3 Min Read
मेहकर येथे जानेफळ रोड कंचनी महाल परिसरात हजरत पिर पहाडी  सरकार यांच्या यात्रेचे दिनांक 07 डिसेंबर 2023 ते 14 डिसेंबर 2023 प्रयन्त आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या यात्रेत अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.दरवर्षी या यात्रेचे आयोजन मेहकर नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष कासम भाई गवळी हे करीत असतात.या यात्रेत दिनांक 08 डिसेंबर रोजी कुल हिंद मुशायरा,दिनांक 09 डिसेंबर ला मेहकर येथील कव्वाल आणि कोल्हापूर येथील लेडीज कव्वला यांचा  कवालीचा मुकाबला दिनांक 10 डिसेंबर रोजी मुंबई येथील सुप्रसिद्ध मुज्तबा अजीज नाजा यांचा कव्वालीचा कार्यक्रम ,दिनांक 11 डिसेंबर रोजी इज्तेमाचा कार्यक्रम आणि दिनांक 12 डिसेंबर रोजी कलकत्ता (पश्चिम बंगाल) येथील लेडीस कव्वाला नेहा नाज यांचा कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.काल दिनांक 07 डिसेंबर रोजी यात्रेच्या पहिल्या दिवशी कुल हिंद मुशायरा कार्यक्रमाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या मुशायरा मध्ये वाहीद अन्सारी मालेगाव,डॉ. गणेश गायकवाड बुलढाणा,कमर एजाज औरंगाबाद,सोहेल आझाद मालेगाव,अजिम रायपूरी बुलढाणा,मुजावर मालेगावी,सलीम नजमी वैजापूर,विभा शुक्ला बनारस,अफझल दानिश बुऱ्हाणपूर,फारुख रजा शेगाव,इम्रान फारीस जळगाव,इब्राहिम सागर धुलिया,जहीर अख्तर मालेगाव,मो.अयमान मो.अलीम मेहकर आणि इर्शाद अंजुम या शायरांनी एकापेक्षा एक अशा सरस कविता गायिल्या आणि  मनोरंजन केले आणि हसवून हसवून लोटपोट केली.तत्पूर्वी या मुशायरा कार्यक्रमाचे मा.नगराध्यक्ष कासम भाई गवळी यांच्या शुभ हस्ते फित कापून  उदघाटन करण्यात आले.या वेळेस प्रा.ओमराज गजभिये,अहेमद हसन काझी, गटनेते मो .अलीम ताहेर,मा .नगर सेवक सुरेश मानवतकर,मुजिब हसन कुरेशी,मुजिब खान, अलियार खान पठाण,मोहन माने, निलेश मानवतकर  ,निलेश सोमण, इब्राहिम रेघीवाले ,प्रल्हाद  पिटकर ,गजेंद्र माने, जयदीप देशमुख,बाळू ससाणे ,अनिल  चांगाडे ,प्रल्हाद कानोडजे,विलास लंबे, शेषराव लंबे,मनोज गोरे,राजू देबाजे, अख्तर कुरेशी, महेबूब गवळी,सद्दाम भवानीवाले ,विजू  म्हस्के,सुरेश मुळे,विजय वायाळ, पवन डोंगर दिवे,स्मित सावजी, सुमित धोटे ,बंडू आंधळे,  मो.कलीम ताहेर,अजीम पेंटर, ,मुजाहिद कुरेशी,इरफान सैयद, अहेमद नूर गवळी,विजय हिवाळे, मुज्जू शेख, नमु शेख, मोजिम शहा,वायू तेलंग,  मुस्तफा पठाण, हुसेन  गवळी , सलीम तांबोळी,नवाज गवळी,ख्वाजा गवळी,  आसिफ  पठान , मोनू खान, चांद भुरीवाले,महमद गवळी ,इमाम गवळी ,चंदु गवळी ,सद्दाम नानगी वाले ,लल्ला गवळी, , सुभान रज्जु रेघीवाले,सुभान चौधरी,सलीम गवळी , अस्लम परसुवाले,इमाम नौरंगाबादी, इलीयास बागवान,हुसेन परसुवाले यांची तसेच कॉंग्रेस पक्षाच्या ,नेते पदाधिकारी ,आणि कार्यकर्ते व सर्व सेलचे पदाधिकाऱ्यांची तसेच मेहकर मतदार संघातील तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या बाहेरील असंख्य रसिक महिला ,पुरुषांची उपस्थिति होती. या कार्यक्रमाचे संचालन इर्शाद अंजुम तसेच जफर सर शकूर सर  यांनी  केले.विशेष या मुशायरा कार्यक्रमाला मेहकर विधान सभा मतदार संघाचे लोक प्रिय आमदार संजयजी रायमुलकर यांनी ही आपली उपस्थिती दर्शविली होती.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *