वाशिम, ; सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या/ शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबोध्द विद्यार्थ्यापैकी इयत्ता 10 वी, इयत्ता 12 वी आणि पदवीनंतरच्या विविध स्तरावरील व्यावसायीक तसेच बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये महाविद्यालयात/ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातील मुला- मुलींप्रमाणे भोजन, निवास शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी शासन निर्णयामध्ये नमुद केल्याप्रमाणे रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट वितरीत करण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन 2016-17 पासून सुरू केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवा सामजिक कार्यकर्ते तथा विध्यार्थी भारती संघटना जिल्हा अध्यक्ष माजी राष्ट्रीय युवा कोर nyks भारत सरकार प्रदिप पट्टेबहादुर यांनी केले आहे. तरी पात्रतेबाबत निकष बघून, तो विद्यार्थी शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबोध्द प्रवर्गाचा असावा. या योजनेसाठी निवड करतांना सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्याचे पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी वाशिम शहर नगरपालिकेच्या क्षेत्रामधील महाविद्यालयात प्रवेशित असावा. विद्यार्थी स्थानिक रहीवासी नसावा. वाशिम शहर नगरपालिकेच्या हद्दीच्या परिसरातील रहिवासी नसावा. इयत्ता 10 वी, 12 वी व पदवी/पदवीका अभ्यासक्रम किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. इयत्ता 11 वी, 12 वी आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थी इयत्ता 11 वी, 12 वी व इयत्ता 12 वी नंतरच्या पदवी/पदवीका व्यावसायीक/ बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेशीत असावा. अभ्यासक्रमाचा कालावधी हा किमान 2 वर्षे असावा. दिव्यांगासाठी (अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील) गुणवत्तेची टक्केवारी किमान 40 टक्के इतकी राहील. विद्यार्थ्यांनी प्रवेशित महाविद्यालयाचे जिल्हयाच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करावा.
तरी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील शासकीय वसतीगृहासाठी अर्ज सादर केलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता swadharyojana.com या संकेतस्थळावरुन ऑनलाईन माहिती भरुन 29 मार्च 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावे. असे आवाहन नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ अध्यक्ष केकतउमरा सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाधार योजना लाभार्थी राष्ट्रीय युवा कोर विध्यार्थी भारती संघटना जिल्हा अध्यक्ष प्रदिप पट्टेबहादुर यांनी केले आहे.
Users Today : 14