छत्रपती संभाजीनगर: लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एक हजार ७९३ किलोमीटर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्याही लाखोंपेक्षा अधिक आहे. या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोहमार्ग पोलिसांवर आहे. लोहमार्ग पोलिस अधीक्षकअंतर्गत जवळपास दहा पोलिस ठाणे, वीस आउट पोस्ट असा मोठा कारभार हा फक्त ६२० कर्मचाऱ्यांच्या जीवावर चालविण्यात येत आहे.छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत परळी, छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, भुसावळ, चाळीसगाव, इगतपुरी, मनमाड, नांदेड, नाशिकरोड आणि शेवगाव असे दहा पोलिस ठाण्यातून कारभार करण्यात येत आहे.गेल्या काही वर्षांत विविध मार्गांवर रेल्वेची संख्या वाढत चालली आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढलेली आहे. या प्रवाशांच्या सोबत होणाऱ्या विविध चोरी किंवा इतर घटनांही वाढत चाललेल्या आहेत. या घटनांशिवाय रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांना पार पाडावी लागत आहे.
या पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षेची जबाबदारी असते. एका पोलिस ठाण्याच्या अंतर्गत धावणाऱ्या रेल्वेवर लक्ष ठेवणे; तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरांवर अंकुश ठेवण्यात येतो. या कामासाठी सध्या लोहमार्ग पोलिसांकडे कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. सर्वसामान्य पोलिस कर्मचाऱ्यांना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची सुरक्षेसह, गुन्हेगार शोधासह न्यायलयीन प्रक्रियेनंतरही काही महत्त्वाच्या घटनांच्या वेळी उपस्थितीत राहावे लागत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयात ६२० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांद्वारे सध्या प्रवाशी सुरक्षेचे काम करावे लागत आहे. सध्या या कार्यालयाकडे सुमारे दीडशे कर्मचारी कमी आहेत. या कमी कर्मचारी संख्येतही लोहमार्ग पेालिसांना आपले कर्तव्य बजजावे लागत आहे. परिणामी त्यांच्यावर ताण येत आहे.रेल्वे स्टेशन – रेल्वेची संख्या
इगतपुरी रेल्वे स्टेशन ७६
परळी २८
नाशिकरोड १४१
नंदुरबार रेल्वे स्टेशन १०२
भुसावळ रेलवे सटेशन ३४१
चाळीसगाव रेल्वे स्टेशन ५४
मनमाड रेल्वे स्टेशन २०८शेवगाव रेल्वे स्टेशन ६४
नांदेड रेल्वे स्टेशन ११४
छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन ५९आउट पोस्टचा असाही फायदा
पोलिस ठाण्याच्या ठिकाणी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह लोहमार्ग पोलिसांतर्गत आउट पोस्ट अशी पोलिस चौकी करण्यात आली आहे. लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयात एकूण २० आउट पोस्ट आहेत. या आउट पोस्टवर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून रेल्वेतील गुन्हेगारांना ताब्यात घेण्याची कारवाई अधिक प्रभावी पद्धतीने करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
Users Today : 3