छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील मंगळवार दिवशी एसटी गावात येत नसल्याने शाळेत जाणारे विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, महिला हे त्रस्त झाले आहेत. देवळगाव गुजरी आठवडे बाजार सुरू करण्यात आल्याने त्याचा परिणाम एसटी बस वाहतुकीवर झाला आहे.हा बाजार मेण रस्ता सोडून थोडे दुकाणी मागे घेण्यात यावे अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मनोहर जगताप यांनी देवळगाव गुजरी ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक व सरपंच यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे दि.२८/१०/२३ रोजी केली आहे.
आठवडे बाजार सुरू करण्यात आल्याने त्याचा परिणाम एसटी बस मंगळवारी बंद असते ती देवळगाव गुजरी हून रस्ता नसल्याने माघारी जात आहे.आता सध्या तरी शासनाने लाखो रुपये खर्च करून रस्ता मोठा केला आहे.मात्र रहदारी जास्त असल्याने बस माघारी फिरत यामुळे जेष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांचे नुकसान होत आहे.
सोयगाव आगार प्रमुख विजय काळवणे यांच्याकडे पत्र दिले आहे की मंगळवारी बस घाणेगाव तांडा,नादां तांडा,डाभा,देव्हारी, टिटवी, पिंपळवाडी व सावळदबारा एवढ्या नागरिकांचे नुकसान होत आहे.असे लेखी निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.एसटी महामंडळाने याविषयी देवळगाव गुजरी ग्रामपंचायत कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुपारच्या सुमारास या बाजारात गर्दी होते, सायंकाळी उशिरापर्यंत हा बाजार सुरू राहत असल्याने पंचक्रोशीतील लोक सावळदबारा येत असताना प्रायव्हेट वाहनाचे वाहनधारक आव्वा सव्वा रुपये घेऊन मनमानी पद्धतीने भाडे घेतात यामुळे विद्यार्थी, महिला व ७५ वर्षाचे जेष्ठ नागरिक खूपच त्रस्त झाले आहे. ७५ वर्षा वरील जेष्ठ नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास नुस्ताच नावालाच का एकीकडे शासन या योजनेच्या माध्यमातून सरकार लोकांच्या उन्नतीसाठी त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत आहे.कोट.
“”पत्रव्यवहार केला, मात्र कार्यवाही नाही..
ग्रामपंचायत कार्यालय देवळगाव गुजरी ता जामनेर मंगळवारी भरत असलेला आठवडे बाजार सुरू केल्याने एसटी वाहतूक बंद झाली आहे.याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाने स्थानिक प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप देवळगाव गुजरी ग्रामपंचायत कार्यालयाने बाजाराची होत असलेली रस्तावर गदीॅ वर कार्यवाही झालेली नाही.
लवकरात लवकर कार्यवाही करावी व सावळदबारा कडे येणारे संपूर्ण एसटी व वाहन चालू करावे नस्ता आम्हाला उपोषणाला बसावे लागेल अशा कडक इशारा दिला आहे.
मनोहर जगताप वंचित बहूजन आघाडी तालुका अध्यक्ष सोयगाव
Users Today : 8