छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,११
लग्न समारंभ,विशेष शुभ कार्य,महाप्रसाद ,व काल्याचे कीर्तन इत्यादी कार्यक्रम समयी हजारो नागरिक भोजन घेतात ,या समयी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक केला जातो अशा समयी वरील घटकांनी भोजन तयार
करताना स्वच्छता, शुद्धता,व दर्जेदार ताजे जेवण तयार करावे शिळ्या अन्नातून विषबाधा प्रमाण वाढत आहे, या साठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करताना अति दक्षता पाळावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी रविवार(ता,११)रोजी वैष्णवी लान येथे केले,निमित्त होते पुष्प ब्रँड मसाला व सिद्धी विनायक ट्रेडर्स यांनी आयोजित केलेल्या आचारी,केटर्स,हॉटेल, व रेस्टॉरंट येथे काम करणाऱ्याचे संमेलन, या संमेलनात तालुक्यातील ग्रामीण भागातील आचारी,व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते,मसाले किंवा ईतर पदार्थ
वापरताना भेसळ होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन ही त्यांनी केले,या निमित्त पुष्प ब्रँड मल्याच्या
वस्तूंचे प्रदर्शन ही आयोजित करण्यात आले होते,अध्यक्षस्थानी किराणा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रकाश शेठ बोथरा होते,तर प्रमुख पाहुणे मराठवाडा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे मराठवाडा उपाध्यक्ष काशीनाथशेठ गायकवाड होते,गोकुळ जुनागडे, यांनी प्रास्ताविक केले,तर राजीव क्षीरसागर व हरिदास क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले,शेवटी राजीव हरिदास यांनी आभार मानले
Users Today : 8