उद्यमशील तरुणांनी नौकरीच्या मागे न लागता स्वतः चे उद्योग उभारणीवर भर द्यावा

Khozmaster
2 Min Read
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
वैजापूर ता,११
आज संगणकीय युगात नौकरी मिळणे जवळपास दुरापास्त झालेले आहे,ज्यांनी तांत्रिक व कौशल्य पूर्ण ज्ञान व पात्रता प्राप्त केली आहे ,अशा उद्यमशील तरुणांनी नौकरी मिळण्याची वाट न पाहता स्वतः च्या ज्ञान,कौशल्य, माहिती व कर्तृत्वाने आपला उद्योग व्यवसाय आरंभ करून  स्वावलंबी बनावे असे प्रतिपादन वैजापूर-गंगापूर चे आमदार प्रा,रमेश पा, बोरनारे यांनी केले,ते ग्लोबल व्हील केअर या संगणकीय ३-डी व्हील अलाईनमेंट या फर्म चे उदघाटन करतांना बोलत होते,कलीम शेख नावाच्या एका उच्च शिक्षित तरुणाने हा उद्योग आरंभ केला,या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ,दिनेश परदेशी यांनी प्रतिपादन केले की,वैजापूर शहर हे झपाट्याने विकसित होत आहे,समृद्धी महामार्ग,नागपूर -मुंबई महामार्ग व निर्मल-नासिक-मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात असल्याने उद्योग व्यवसायाला खूप वाव आहे,अध्यक्षस्थानी वैजापूरच्या मावळत्या अध्यक्षा शिल्पाताई परदेशी होत्या, वैजापूर शहरात प्रथमच कॉम्प्युटर द्वारे चार चाकी वाहन दुरुस्ती ही फर्म आहे,आपल्या प्रास्ताविकात सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी या फर्म च्या कामाची पूर्ण माहिती उपस्थिताना दिली व सूत्र संचलन केले,साबेर
पठाण, व कलिम लतीफ शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगी  माजी आ,भाऊसाहेब पा,चिकटगावकर, शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रमुख बाबासाहेब जगताप, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पा, साळुंके,शहर प्रमुख पारस घाटे  भाजपा शहर अध्यक्ष दिनेश राजपूत,उपनगराध्यक्ष साबेरखान, मजीद कुरेशी,गुजराथ येथून आलेले हाजी शेख रहीम,
राज महमंद शेख,सरपंच दौलत गायकवाड,हमीद शेख, संजय बोरनारे,अमोल बोरनारे ,श्री नाईकवाडी,भरत कदम यांची उपस्थिती होती,
0 9 3 8 4 6
Users Today : 8
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *