वाशीम :- महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाचे अभ्यासू , कणखर नेते अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या नेतृत्वात माझ्यासारख्या लाखों तरुणांमध्ये क्रांती घडवण्याची ताकद असून अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या नेतृत्वात समाजातील युवकांमध्ये क्रांती घडत आहे असे प्रतिपादन डिपीआय विदर्भ युवक अध्यक्ष भाई छोटू कांबळे यांनी वाशीम येथे काल दि.१० डिसेंबर रोजी आयोजीत विदर्भ मातंग युवा क्रांती परीषद कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमाचे आयोजन डेमोक्रॅटिक पार्टीचे वाशिम जिल्हा अध्यक्ष संतोष इंगळे यांनी केले होते तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. चंद्रकांत साळवे, बीड जिल्हाध्यक्ष सुभाष लोणके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.सोनाली इंगळे डीपीआय विदर्भ युवक अध्यक्ष डीपीआय विदर्भाध्यक्ष प्रा . अविनाश पवार हे होते.
यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा कामगार आघाडी कृष्णा साळवे , युवक उपजिल्हाध्यक्ष स्वप्निल जाधव , चिखली तालुका अध्यक्ष दिलीप चव्हाण, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख लखन अवसोरमोल , सावळी शाखा उपाध्यक्ष अविनाश जाधव यावेळी हजर होते.
Users Today : 14