वनविभागाचा निर्लज्जपणा समोर ! अधिवेशनात सांगितलं ढळढळीत खोटं, ‘तो’ मोर मेला नसल्याचा केला दावा

Khozmaster
2 Min Read

सांगली येथील कुपवाड परिसरात जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या मोराला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरुन नेल्याचे अख्ख्या सांगलीने पाहिले. मोर दवखान्यात दाखल करण्यापूर्वीच दगावला. मात्र, अशी कोणतीही घटना घडली नाही, असा दावा वन विभागाने नागपूर अधिवेशनात केला गेला.

आमदार मानसिंगराव नाईक यांनी अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला मिळालेल्या उत्तराने वन विभागाचा खोटेपणा चव्हाट्यावर आल्याचा हल्लाबोल नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केला. या प्रश्नावर उद्या (ता.११) वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाब विचारणार असल्याचे आमदार नाईक यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

0 9 3 8 5 4
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *