कोलीक ः संविधानाबद्दल माहिती सांगताना अभिजित कांबळे. या वेळी हर्षवर्धन कोळसेकर, सावंत आदी उपस्थित होते.
———————-
संविधानाची जपणूक भारतीयाचे कर्तव्य
अभिजित कांबळे ः कोलीक येथील सातेरी विद्यालयात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ ः भारतीय संविधानाने मानवी मूल्यांच्या मर्यादा निश्चित केल्या आहेत. आदर्श समाजरचनेमध्ये संविधानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याची जपणूक करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे मत अभिजित कांबळे यांनी व्यक्त केले.
कोलीक (ता. चंदगड) येथील सातेरी विद्यालयात संविधान पंधरवडा साजरा झाला, त्या वेळी ते बोलत होते. हर्षवर्धन कोळसेकर अध्यक्षस्थानी होते.
कांबळे यांनी संविधान म्हणजे काय, त्याचे व्यक्ती आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये योगदान काय, व्यवहारामध्ये त्याचा येणारा प्रत्यक्ष संबंध याविषयी विवेचन केले. जात, धर्म, पंथ यापेक्षाही एक व्यक्ती म्हणून त्याचे हक्क आणि कर्तव्य काय असतात, समाज एकसंघ राहावा, राष्ट्रीय भावना वाढीला लागावी, यासाठी संविधानाच्या माध्यमातून तयार केलेल्या नियमावली याची माहिती दिली. पंधरा दिवसांत तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेत जाऊन संविधानाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचे सांगितले. दुर्गम भागात संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्याची खूप गरज असल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे स्पष्ट केले. कोळसेकर यांनीही संविधानाची निर्मिती आणि भारताच्या जडणघडणीचा दृष्टिकोन विषद केला. सावंत यांनी सूत्रसंचालन केले. आर. के. पाटील यांनी आभार मानले.
संविधानाची जपणूक भारतीयाचे कर्तव्य
0
9
3
8
5
4
Users Today : 16
Leave a comment