समृद्धी महामार्गावर उभारले जाणार १६ नवे फुडकोर्ट! पेट्रोल पंप, स्वच्छतागृहांची सोय; दादा भुसेंची विधान परषदेत माहिती

Khozmaster
3 Min Read

नागपूर-मुंबई हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावण्यासोबतच अपघातांच्या घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून
लवकरच या महामार्गालगत १६ नवीन पेट्रोल व डिझेलपंप लावण्यात येतील. यासोबतच स्वच्छतागृहांच्या व्यवस्थेसह फुडकोर्ट उभारण्यात येतील, त्यासाठी निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाल्या आहेत, अशी माहिती राज्य शासनाच्यावतीने राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता.८) विधानपरिषदेत दिली.

समृद्धी महामार्गावर उद्‍घाटन झाल्यापासून आतापर्यंत या रस्त्यावर आतापर्यंत ८६० अपघात झाले आहेत. यात नागपूर विभागात ५६०, संभाजीनगर विभागात २९७, पुणे विभागात १४ तर नगर विभागात १० अपघात झाले आहेत. यात १४२ जणांना प्राण गमवावा लागला.

अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण विक्रम काळे, अंबादास दानवे आदींनीही चर्चेत सहभागी झाले होते. मंत्री दादा भुसे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. समृद्धी महामार्गावर रस्त्याचा दोन्ही बाजूला बॅरियर्स उभारण्याचे ७० टक्के कामे पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत ६० लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून यशस्वी प्रवास केला आहे.

आतापर्यंत ७३ मोठे अपघात झाले असून १४२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अपघाताप्रसंगी १० मिनिटांमध्ये वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. जांबरगाव येथील अपघातातही १८ जणांची परवानगी असताना ३४ प्रवासी होते.वेग नियंत्रकही नव्हते. अपघाताती १३ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख प्रमाणे एकूण ६५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या प्रकरणात दोन पोलिसांनाही निलंबित करण्यात आले आहे. सध्या महामार्गावर १०-१२ पेट्रोलपंप असून ही संख्या अपुरी आहे. त्यामुळे लवकरच १६ नवीन पेट्रोल, डिझेल पंप उभारण्यात येईल. फुडकोर्ट, प्रसाधनगृहाची देखील व्यवस्था उपलब्ध होणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया देखील झाल्याचे भुसे यांनी सांगितले. वन्यजीवांना वावर थांबविण्यासाठीही उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

यामुळे या अपघाताकडे शासनाचे लक्ष वेधण्यासोबतच उपाययोजनांसंदर्भातील लक्षवेधी सूचनेद्वारे सदस्य अमोल मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केला. मिटकरी यांनी सभागृहाला सांगितले की, वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथे १४ ऑक्टोबरच्या रात्री झालेल्या अपघातात १३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला.२२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

अनिकेत तटकरे, सतीश चव्हाण विक्रम काळे, अंबादास दानवे आदींनीही चर्चेत सहभागी झाले होते. मंत्री दादा भुसे यांनी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. समृद्धी महामार्गावर रस्त्याचा दोन्ही बाजूला बॅरियर्स उभारण्याचे ७० टक्के कामे पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत ६० लाख वाहनांनी समृद्धी महामार्गावरून यशस्वी प्रवास केला आहे.

आतापर्यंत ७३ मोठे अपघात झाले असून १४२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अपघाताप्रसंगी १० मिनिटांमध्ये वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे. जांबरगाव येथील अपघातातही १८ जणांची परवानगी असताना ३४ प्रवासी होते.

वेग नियंत्रकही नव्हते. अपघाताती १३ मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख प्रमाणे एकूण ६५ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या प्रकरणात दोन पोलिसांनाही निलंबित करण्यात आले आहे. सध्या महामार्गावर १०-१२ पेट्रोलपंप असून ही संख्या अपुरी आहे. त्यामुळे लवकरच १६ नवीन पेट्रोल, डिझेल पंप उभारण्यात येईल. फुडकोर्ट, प्रसाधनगृहाची देखील व्यवस्था उपलब्ध होणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया देखील झाल्याचे भुसे यांनी सांगितले. वन्यजीवांना वावर थांबविण्यासाठीही उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

0 9 3 8 5 4
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *