धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी ऊर्जा व उद्योग या विषयावर लक्षवेधी उपस्थित केली*

Khozmaster
4 Min Read
आज दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे सभागृहामध्ये बोलताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी विशेष करून ऊर्जा,उद्योग, पाणीपुरवठा, वॉटरमीटर,या विषयासह अनेक लक्षवेधी उपस्थित केली, यामध्ये बोलताना प्रामुख्याने सांगितले की, शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी होत असते परंतु वेळेवर
रोहित्र मिळत नाही,रोहित्रांची क्षमता 63 किंवा 100 असते परंतु त्यावरील कनेक्शन हे दुप्पट प्रमाणावर असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्युत रोहीत्रांचे स्फोट होतात त्या जळतात, आणि अनेक दिवस त्या डी.पी शेतकऱ्यांना मिळत नाही आणि मग कोमेजून गेलेली पिके शेतकरी बघू शकत नाही आणि त्यामुळे शासनाने सौरकृषी योजना सुरू केलेली आहे, या योजना जर ताबडतोबिने पुढच्या पेरणीच्या आत जर पूर्णत्वास नेल्या तर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना सौर कृषी वाहिनीची वीज मिळून 12 तास सकाळी 6 आणि संध्याकाळी 6 तास त्यामुळे त्याला विजेची गरज पडणार नाही कारण सौर उर्जेवर तो आपले पंप चालू शकतो, आणि आपल्या पिकांना पाणी देऊ शकतो…!
 अनेक ठिकाणचे रोहित्र 63 चे आहे, त्यांची क्षमता वाढून त्या 100 चे करणे आवश्यक आहे, कृषी पंपाचे कनेक्शनचे अर्ज 5 ते 6 वर्षांपासून संबंधित विभागाकडे पडून आहे त्यामुळे त्यांना कनेक्शनची परवानगी मिळत नाही आणि म्हणून शेती देखील सिंचनाखाली येत नाही, अवकाळी पाऊस असेल, वादळ असेल यामुळे शेतातील विद्युत पोल उन्मळून पडतात आणि ते देखील लवकरात लवकर विद्युत विभागाकडून उचलल्या जात नाही, अनेक दिवस विजेचा पुरवठा खंडित असतो,आणि म्हणून या संदर्भात संबंधित विभागाने अशा घटना घडल्यानंतर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे अशी महत्त्वाची मागणी यावेळी केली…!
उद्योगाच्या संदर्भामध्ये बुलढाणा आणि मोताळा या दोन्ही तालुक्याला एमआयडीसीचे क्षेत्र खूप कमी लागलेली आहे, बुलढाण्याला 25 एकर आणि मोताळ्याला 0 एकर परंतु आता मात्र शासनाने मोताळ्याला 250 एकर जमीन आणि बुलढाण्याला 650 एकर जमीन देण्यासंदर्भात कारवाई सुरू केली आहे, संबंधित विभागाकडे गेल्या अनेक वर्षापासून प्रस्ताव पडून आहे, परंतु अद्याप पर्यंत त्याची मान्यता देखील झालेली नाही, त्या *मान्यता जर झाल्या तर निश्चितपणे एमआयडीसीचे क्षेत्र वाढेल, बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल, औद्योगिक वसाहत उभी राहील आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि म्हणून शासनाने या एमआयडीसीच्या मान्यता संबंधित विभागाला लवकरात लवकर मिळवून द्यावे ही यावेळी अतिशय महत्त्वपूर्ण मागणी केली…!
पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या विषयावर बोलताना सांगितले की, ग्रामीण भागामध्ये संपूर्ण गावामध्ये पाणीपुरवठाच्या योजना शासनाचे आहे, जनतेकडून टॅक्सची वसुली होत नाही, एम एस ई बी चे देणं दिल्या जात नाही, आणि त्यामुळे त्या ठिकाणचा वीजपुरवठा हा खंडित केला जातो, अनेक योजना या एकत्रित स्वरूपाच्या आहेत,कुठे दहा गावचे कुठे पाच गावचे तर कुठे पंधरा गावचे देखील आहे, काही लोक पैसे देत नाही आणि काही देतात, आणि त्यामुळे सारखे *विजेची कनेक्शन कट झाल्यामुळे जनतेला पाणी वेळेवर मिळत नाही आणि म्हणून या सर्व योजना जर आपण सौर उर्जेवर सुरू करू शकलो तर वीज बिल भरण्याचा प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही त्यामुळे या सर्व योजना सौरऊर्जेवर घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण मागणी यावेळी केली…!
बुलढाणा शहरामध्ये 119 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे ती योजना आता अंतिम टप्प्यामध्ये आहे,पाण्याचा अपव्यय टाळण्याकरता पाण्यावर जर आपण मीटर बसवले तर पाण्याचा अपव्यय नक्की टळेल आणि कमी पाण्यामध्ये जास्त लोकांचे नियोजन होऊ शकेल त्यामुळे या योजनेमध्ये वॉटरमीटरचा समावेश करण्यात यावा अशी महत्त्वपूर्ण मागणी देखील यावेळी केली…!
0 9 3 8 5 6
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *